Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : रानकवी तुकाराम धांडे यांचे शाळेत काव्यवाचन

जुन्नर : रानकवी तुकाराम धांडे यांचे शाळेत काव्यवाचन

जुन्नर / आनंद कांबळे : जुन्नर तालुक्यातील तेजूर ठाकरवाडी शाळेत रानकवी तुकाराम धांडे यांनी काव्यवाचन केले . वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने वनक्षेत्रपाल मारुती फुलसुंदर, वनरक्षक सचिन कवटे व संदीप लांडे यांनी शाळेस भेट देवून वन्यजीव बाबत माहिती देवून मार्गदर्शन केले.

दरम्यानच्या काळात आदिवासी रानकवी तुकाराम धांडे यांचे आगमन स्वागत व कविता सादरीकरण करण्यात आले. यामधे इयत्ता 3 री भाषा विषयातील रानवेडी व इ.9 वीची कविता त्याच्या मूळ काव्य गायन करून सांगितली. मुले मंत्रमुग्ध होवून ऐकत होती. त्याच्या मनामध्ये निसर्गविषयक प्रेम, आपुलकी, मित्रत्वाचे अतूट नाते तयार करण्याचे काम त्यांच्या काव्यवाचनाने झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन नांगरे यांनी केले.

स्वागत मुख्याध्यापक आ.का.मांडवे यांनी केले, कवींचा परिचय मोहन उंडे यांनी तर आभार तानाजी तळपे यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन लक्ष्मण कुडेकर यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय