Sunday, May 19, 2024
Homeजुन्नर'जुन्नर ते पुणे' पीएमपीएमएल बससेवेचा पुढील आठवड्यात शुभारंभ

‘जुन्नर ते पुणे’ पीएमपीएमएल बससेवेचा पुढील आठवड्यात शुभारंभ

जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका हा ‘पर्यटन तालुका’ आहे. देशभरातून पर्यटक ‘शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी, जुन्नर, नारायणगाव, ओझर, लेण्याद्री, नाणेघाट येथे ये – जा करत असतात. या पर्यटनस्थळी जाण्यासाठी आता पिंपरी चिंचवड ते किल्ले शिवनेरी जुन्नर अशी पीएमपीएमएल ची बससेवा सुरू होणार आहे.

शिवजयंती उत्सवासाठी आमदार अतुल बेनके यांनी केली ‘इतक्या’ कोटी रूपयांची मागणी

जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर अशी बससेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनीही देखील पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांना भेटून बससेवा सुरू करण्याची मागणी केली होती.

नारायणगाव, जुन्नर परिसरातील नागरिक व कामगार विद्यार्थी हे देखील पुणे, पिंपरी चिंचवडला जाण्यासाठी खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत. काही दिवसांपूर्वी भोसरी ते मंचर पीएमपीएमएलची बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

घरकुलच्या प्रतिक्षेत असलेल्या ‘ड’ यादी धारकांसाठी खुशखबर ! ‘या’ तारखेपर्यंत मिळणार १०० टक्के मंजूरी

तसेच, जुन्नर, नारायणगाव हे शहर झपाट्याने वाढत आहे, दर रविवारी पर्यटन तसेच शिवभक्त मोठ्या प्रमाणावर किल्ले शिवनेरी या ठिकाणी येत असतात. तसेच अष्टविनायकापैकी दोन स्थळे जुन्नर तालुक्यात असल्यामुळे गणेश भक्तांची ये-जा असते. नारायणगाव, जुन्नर परिसरातील नागरिक व कामगार, विद्यार्थी हे खाजगी वाहनाने प्रवास करत आहेत. बस सेवा सुरु झाल्यास पर्यटक व प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

पीएमपीएमएल प्रशासनाने भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर या मार्गाचा सर्व्हे नुकताच केला आहे. तसेच या संदर्भात आज (दि.३) जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचीही भेट आ.अतुल बेनके यांनी घेतली होती. तसेच पीएमपीएमएलच्या वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा केली या मागणीची दखल घेत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे बेनके म्हणाले. 

शिवसेनेच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

येत्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यापासून भोसरी ते किल्ले शिवनेरी जुन्नर या बससेवेचा लाभ शिवभक्तांना मिळणार आहे, असेही आ.बेनके म्हणाले. या संबंधीचे वृत्त ‘सजग मराठी’ ने दिले आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय