Sunday, May 5, 2024
Homeजुन्नरमहिलेने पोलीस भरती बद्दल विचारलं, भामट्या पोलिस हवालदाराने नग्न होऊन केला व्हिडिओ...

महिलेने पोलीस भरती बद्दल विचारलं, भामट्या पोलिस हवालदाराने नग्न होऊन केला व्हिडिओ कॉल, जुन्नर तालुक्यातील संतापजनक घटना


जुन्नर (पुणे) : जुन्नर येथील विवाहितेला पोलीस भरतीसाठी मदत करण्याच्या उद्देशाने तिच्याशी अश्लील चॅटिंग करणाऱ्या आणि व्हिडीओ कॉलकरून नग्न होऊन विक्षिप्त प्रश्न करणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस हवालदारावर अखेर तो काम करत असलेल्या जुन्नर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदाराच्या या संतापजनक कृत्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बाळू जोरी असं या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पीडितेने थेट पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून जुन्नर पोलिसात धाव घेतली आणि ट्रॅफिक हवालदार पोलीस गणेश जोरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

जुन्नर : पिंपळगाव-जोगा धरणात बोट उलटून एकाचा मृत्यू

29 वर्षीय विवाहित तरुणीचे शिक्षण 12 वी डीएड असून ती विविध ठिकाणी सूत्रसंचालनाचे काम करत आहे. पुणे येथून प्रसिद्ध होणाऱ्या एका वृत्तपत्रात पोलीस भरती बाबतची जाहिरात तिने वाचली होती. 15 जूनला पोलीस भरती आहे त्यासाठी तिला मदत हवी होती. यासाठी तिने आपल्या आईकडून जुन्नर मधील काही पोलिसांचे नंबर घेतले होते. पोलीस भरतीसाठी आपणाला मार्गदर्शन करावे, असे फोनद्वारे संपर्क करून विचारले होते. 

मात्र या दरम्यान 3 जून रोजी जुन्नर पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार गणेश जोरी या पोलिसाला पीडित महिलेने मोबाईलवर फोन करून भरतीबाबत मार्गदर्शन करा, अशी विनंती केली. गणेश जोरी यांनी 6 जून रोजी रात्री बाराच्या दरम्यान व्हॉट्सअॅप मेसेज करून आणि फोन करून पोलीस भरतीच्या शारीरिक तपासणीबाबत बोलायला सुरुवात केली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

यामध्ये त्याने पहिल्यांदा तुमचा फोटो पाठवा, तुमचे वजन किती? उंची किती ? असे म्हणून तुम्ही तुमच्या मुलीला अंगावर दूध पाजता का? तुमच्या ब्राची साईज काय आहे? तुम्ही लूज ब्रा वापरता का? पोलीस प्रशिक्षणामध्ये रनिंग करावी लागते त्यामुळे तुम्हाला टाईट ब्रा घालावी लागेल. तुमच्या पायाच्या मांड्या एकमेकांना घासतात का असे अश्लील भाषेत बोलला. परंतु पोलीस भरतीसाठी तो एक शारिरीक चाचणीचा भाग असेल असे समजून पीडितेने त्याकडे दुर्लक्ष केले.

मात्र 7 जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास पुन्हा जोरी याने पीडितेला व्हॉट्सअॅपवर कॉल करून वैयक्तिक माहिती विचारण्यास सुरुवात केली. तेव्हा तुमचे आणि तुमच्या नवऱ्याचे पटत नाही का? एकटेच राहता का ? तुमच्या नवऱ्याचे बाहेर काही चालू आहे? असेल तर ते कसे ओळखायचे? तुमचा नवरा सेक्स करताना तुमच्यावर तुटून पडतो का? जर तो तुटून पडत असेल तर त्याचे बाहेर अफेअर चालू असेल. असे समजा आणि मला सांगा की रोज तुम्ही किती वेळा सेक्स करता. यावर पीडितेला लज्जा उत्पन्न झाली आणि तिने मुलगी रडत आहे असे सांगून फोन कट केला.

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मात्र नंतर त्याने व्हिडीओ कॉल केला आणि अंगात कोणतेही कपडे घातले नव्हते. मात्र पुन्हा फोन करून असेच बोलू लागला. तेव्हा पीडितेने फोन कट केला. रात्री बाराच्या सुमारास पुन्हा व्हॉट्सअॅप कॉल केला आणि पीडितेसोबत असेच अश्लील बोलू लागला. तेव्हा पीडितेने पुन्हा त्यांचा कॉल कट केला. त्यानंतर त्याने मेसेज केले त्या मेसेजला पीडितेने नॉर्मल रिप्लाय केले. जोरी पोलीस हा व्हिडिओ कॉल करताना त्यांच्या अंगात कपडे घातलेले नव्हते, तो बोलताना त्यांच्या छातीवर हाताने चोळत होता. हे पीडितेला खटकले आणि लज्जा उत्पन्न होईल असे वाटले म्हनून फोन कट केला.

शेवटी दिनांक 8 जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्यांने पुन्हा व्हॉट्सअॅप मेसेज करून माफी मागितली आणि तुम्ही माझ्याशी बोला वगैरे मेसेज केले या सर्व प्रकाराला कंटाळून पीडितेने थेट पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून जुन्नर पोलिसात हवालदार गणेश जोरी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारमुळे हादरलेल्या पीडितेनं या हवालदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदारास निलंबित करण्यात आले असल्याची माहिती जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. 

जुन्नर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, असे असेल आरक्षण

जुन्नर : साईश्रद्धा मंगल कार्यालयात पार पडला सहावा आंतर धर्मीय विवाह सोहळा

पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, 1600 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय