Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाजुन्नर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, असे असेल आरक्षण

जुन्नर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, असे असेल आरक्षण

जुन्नर : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जुन्नर नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आज सोमवार ता.१३ रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर व मुख्याधिकारी मनोज पष्टे यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सोडत काढण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष पापा खोत, गटनेते फिरोज पठाण, समीर भगत, ऋषकेश जोगळेकर, विनायक गोसावी तसेच इच्छुक उमेदवार, पक्षीय कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 

जुन्नर : ‘ती’ ने पोलीस भरती बद्दल विचारलं, भामट्या पोलिस हवालदाराने न्यूड होऊन केला व्हिडिओ कॉल, संतापजनक घटना

नगर परिषदेच्या प्रभाग संख्येत दोन ने वाढ झाल्याने प्रभागसंख्या दहा व सदस्य संख्येत तीन ने वाढून वीस झाली आहे. प्रत्येक प्रभागातून दोन सदस्य निवडून द्यायचे आहेत. महिलांसाठी ५० टक्के राखीव जागा असल्याने प्रत्येक प्रभागात एक महिला याप्रमाणे दहा जागा महिलांसाठी राखीव आहेत.

प्रभाग क्रमांक १ मध्ये १ जागा अनुसूचित जमाती महिला व १ सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर प्रभाग क्रमांक २ मध्ये १ जागा अनुसूचित जाती महिला व १ सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असणार आहे. प्रभाग क्रमांक ३ ते १० मध्ये एक जागा सर्वसाधारण महिला व दुसरी जागा सर्वसाधारण गटासाठी राखीव असणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याशिवाय आरक्षण सोडत काढण्यात आली आहे.

पुणे येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन, 1600 जागांसाठी भरती

या सोडतींविषयी सूचना व हरकती बुधवार ता. १५ ते मंगळवार ता. २१ दुपारी ३ वाजेपर्यंत नगर परिषद कार्यालयात दाखल करता येतील. अंतिम अधिसूचना १ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्याने प्रभाग निहाय इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, काँग्रेस व अन्य पक्षांनी स्वबळावर निवडणूकीसाठी उमेदवार उभे केल्यास निवडणूक चूरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत.

जुन्नर : पिंपळगाव-जोगा धरणात बोट उलटून एकाचा मृत्यू

जुन्नर : साईश्रद्धा मंगल कार्यालयात पार पडला सहावा आंतर धर्मीय विवाह सोहळा

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माळी, उद्यान अधिकारी पदांच्या रिक्त जागांसाठी भरती, 19 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय