Friday, April 26, 2024
Homeग्रामीणजुन्नर : गांजा'ची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोकल क्राईम ब्रँच व पोलिसांकडून...

जुन्नर : गांजा’ची तस्करी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोकल क्राईम ब्रँच व पोलिसांकडून अटक; सिने स्टाईल पाठलाग करून केले जेरबंद !

जुन्नर / रवींद्र कोल्हे : सोमवार दि.१६ ऑगस्ट रोजी नारायणगाव पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात लोकल क्राईम ब्रँच (LCB) चे पोलिस पेट्रोलिंग करीत असतांना एका पांढऱ्या रंगाची मारुती कंपनीची सुझिकी विटारा ब्रिझा गाडीचा चालक संशयित रित्या पुणे-नाशिक रस्त्यावरून जात असतांना संशयावरून नारायणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून सराईत आरोपीला वाहनासह ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवार दि.१६ ऑगस्ट रोजी पुणे ग्रामिणचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस पुणे नाशिक महामार्गावर पेट्रोलिंग (गस्त) करीत होते. त्याचवेळी एका गुप्त बातमीदारकडून त्यांना एका ब्रिझा गाडीतून गांजाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. बातमीच्या आधारे नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना माहिती कळविण्यात आली. त्यावरून नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी पो.शी.लोहटे, वाघमारे यांच्या मदतीने एक पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी विटारा ब्रिझा गाडी एमएच १२ जि एच ४१७३ (MH 12 GH 4173) नंबर प्लेट असलेली भरधाव वेगात व न शरीरातील वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून नाशिक च्या दिशेने जातांना दिसली. गाडीच्या चालकाची हालचाल संशयास्पद असल्याचे आढळून आल्याने त्या गाडीला ‘हॉटेल गिरीजा’समोर पाठलाग करून पकडले.

गाडीची झडती घेतली असता, त्यात एकूण ६ किलो ९७५ ग्रॅम गांजा आढळून आला. चालकाला त्याचे नाव विचारले असता, दीपक बच्चू तामचिकर, रा.धलेवाडी, ता.जुन्नर असे सांगितले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमालासह गांजा व अंदाजे ९ लाख रुपये किंमतीची जुनी वापरलेली ब्रिझा गाडी असा एकूण १० लाख १५ हजार ७७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

आरोपीची कसून चौकशी केली असता, त्यांचेवर तीन गुन्हे दाखल असून आरोपी सराईत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण (LCB) विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार सुनील जावळे, प्रकाश वाघमारे, पोह. मुकुंद आयचीत, नायक पोशी समाधान नाईकनवरे यांनी नारायणगाव पोलिसांच्या मदतीने सदरची कारवाई केली. पुढील तपास नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलिस करीत आहेत.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय