Home ग्रामीण जुन्नर : उमेदवारी अर्ज दाखल करताना दडवली माहिती, आमदार बेनके यांच्या विरोधात...

जुन्नर : उमेदवारी अर्ज दाखल करताना दडवली माहिती, आमदार बेनके यांच्या विरोधात याचिका

जुन्नर, दि ७ जुलै : निवडणूक प्रतिज्ञापत्रात पॅन कार्ड व इतर बाबत खोटी माहिती दिल्या प्रकरणी जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या विरुद्ध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल भागाजी भांगरे व डॉ. अभिषेक हरिदास यांनी जुन्नर कोर्टात आमदार अतुल वल्लभ बेनके यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. आमदार अतुल बेनके यांनी त्यांच्या २०१४ व २०१९ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात वेगवेगळे पॅन नंबर दिले असून त्यांच्या पत्नी एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या संचालिका असल्याचे लपवले असल्याचे म्हटले आहे.

तसेच आ. बेनके यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्ता देखील लपवली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते अनिल भांगरे व डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयात धाव घेतली असून दिनांक ६ जुलै २०२१ रोजी याचिका दाखल केली आहे.

आ. बेनके यांनी फेटाळले आरोप 

आमदार अतुल बेनके यांनी सर्व आरोप फेटाळले असून मला बदनाम करण्यासाठी असे प्रकार केले जात असल्याचेही म्हटले आहे. तसेच माझ्यावर शरद पवार आणि वल्लभ बेनके यांचे संस्कार आहेत. माझ्यावर जी याचिका दाखल केली आहे, त्यावर माझे चार्टर्स अकाऊंटन व वकील कायदेशीर उत्तर देतील, असेही आ. बेनके म्हणाले.