Friday, November 22, 2024
Homeग्रामीणजुन्नर : ग्रामपंचायत आंबे - पिंपरवाडीचे काम आदर्शवत, नामदेव वाडी येथील वस्तीत...

जुन्नर : ग्रामपंचायत आंबे – पिंपरवाडीचे काम आदर्शवत, नामदेव वाडी येथील वस्तीत पाईपलाईन सुरू

जुन्नर : ग्रुप ग्रामपंचायत आंबे – पिंपरवाडी मधील नामदेव वाडी येथे पाईपलाईन करण्यात आल्याने वस्तीमधील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच सरपंचांच्या कामाचे कौतुक देखील केले जात आहे.

नामदेव वाडी येथील महिलांना पाणी आणण्यासाठी भर पावसात चिखल तुडवत जावे लागत होते. अनेकदा चिखलामुळे पाय घसरुन पडल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती महिलांनी सरपंच मुकुंद घोडे यांना दिली.

मुकुंद घोडे यांनी ग्रामपंचायत बॉडीची बैठक घेऊन नामदेव वाडी येथे पाईपलाईन करण्याचा विचार मांडला. ग्रामसभेत पाईपलाईन करण्याबाबत निर्णय झाला. व नामदेव वाडी येथील पाईपलाईन प्रत्यक्षात आली. पाईपलाईन झाल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पाईपलाईनसाठी ग्रामपंचायत मधील ५ टक्के (पेसा) अबंध निधीमधून वापर करण्यात आला आहे. तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतीमधील अशा प्रकारे पाईपलाईन करुन आंबे – पिंपरवाडी ग्रामपंचायतीने आदर्श घालून दिला आहे.

ही पाईपलाईन करण्यात सरपंच मुकुंद घोडे, उपसरपंच अलका काठे, गोविंद रेंगडे, भरत सावळे, लता किर्वे, मिराशा डरळे, रंजना घोडे, तसेच ग्रामसेवक लहु भालिंगे, पेसा अध्यक्ष हनुमंत काठे, धमाबाई शेळकंदे यांचे योगदान लाभले. तसेच नामदेव वाडी येथील नागरिकांना श्रमदानातून पाईपलाईन खोदण्यापासून चालू करुन देईपर्यंत योगदान दिले.


संबंधित लेख

लोकप्रिय