जुन्नर, दि. १ जूूून : (पुणे) : जुन्नर तालुक्यातील “ग्रामपंचायत खामगाव” येथे आदिवासी वाड्या वस्त्यांमधील २५० पेक्षा जास्त कुटुंबांना अंदाजे २ लक्ष रुपये चे अन्नधान्य किराणा किटचे वाटप करण्यात आले.
कोरोना काळात लॉकडाऊनच्या संकटात एक हात मदतीचा दिला आहे. अशोक चौक मित्र मंडळ नाना पेठ पुणे आणि संत गोरा कुंभार भजनी मंडळ, नाना पेठ यांच्या माध्यमातून खामगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच अजिंक्य घोलप ह्यांच्या सहकार्यातून हे किट वाटप करण्यात आले.
खामगाव येथे शिवेचीवाडी, मांगणीवाडी, खंडोबाची वाडी ह्या ठाकरवस्तीमधील प्रत्येक कुटुंबाला अन्नदान किराणा किटचे वाटप करण्यात आले.
या किटमध्ये साखर, तेलपुडा, कोलगेट, भांडे साबण, अंगाचा साबण, पॅराशूट तेल, मिरची पावडर पुडी, कांदा लसुन मसाला, हरबरा, वटाने, गहू पीठ, तांदूळ, चहा पावडर पुडा, पोहे, बिस्कीट पुडे, तूरडाळ, मीठ, मूग ह्या साहित्याचा समावेश होता.
शिवभक्त बंडू आंधेकर ह्यांच्या विशेष सहकार्यातून मंडळाचे अध्यक्ष गणेश कोमकर, उपाध्यक्ष अनिकेत कोठावळे, सुनिल धानीपकर, संकेत कदम, रुपेश पवार, स्वप्निल कुंभारकर, बाळासाहेब शिंदे, तुषार गव्हाणे, पप्पू कोठावळे हे उपस्थित होते.
तसेच यावेळी जि.प.सदस्य भाऊसाहेब देवाडे, उपसरपंच गिरीधर नेहरकर, दशरथ घोलप, सरपंच सुवर्णा जाधव, धोंडू काळे, रंजनाबाई काळे, कुसुमबाई केदारी, वैशाली नेहरकर, राजाराम खंडागळे सुनिता केदारी, पाराजी केदारी, अमित शेलार, दिपक घोलप, राजेश घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती.
तसेच सागर घोलप, कुणाल घोलप, ओम घोलप, ओंकार घोलप, अजित पवार ह्यांचे सहकार्य लाभले.