Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणजुन्नर तालुक्यातील सरपंच एकवटले, कोरोनाची तिसऱ्या लाटेला वेशीवरच रोखणार !

जुन्नर तालुक्यातील सरपंच एकवटले, कोरोनाची तिसऱ्या लाटेला वेशीवरच रोखणार !

“कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी उभारणार यंत्रणा ! 

नारायणगाव, दि.३१ मे : “कोरोनाच्या तिसऱ्या चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील सरपंच सज्ज झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अहवानाला तालुक्यातील सरपंचांनी प्रतिसाद दिला आहे.

ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातील मिळणाऱ्या निधी पैकी २५ टक्के निधी खर्च करण्याचा अधिकार सरपंचांना मिळावा, सरपंच आणि उपसरपंच यांनी कोरोना प्रादुर्भाव निर्मूलनासाठी आपले मानधन जमा केले आहे. तसेच मानधन, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार,खासदार यांनी स्थानिक प्रशासनाकडे जमा करावे, प्राथमिक केंद्र, ग्रामीण रुग्णालय आशा आरोग्य व्यवस्थापन किमेटीत ग्रामपंचायतींना सामावून घ्यावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी तसेच तिसऱ्या लाटेशी सामना करण्यासाठी तालुक्यातील सरपंच एकवटले आहेत. 

जुन्नर तालुक्यातील सरपंचांनी एकत्र येऊन बैठकीचे आयोजन केले होते. वारुळवाडी येथील ग्रामसंसद भवन येथे झालेल्या बैठकीला नारायणगाव आणि शिवारातील सरपंच उपस्थित होते.

पंधराव्या वित्त आयोगाच्या ग्रामपंचायतींना मिळणाऱ्या निधीतील २५ टक्के निधी कोरोना प्रादुर्भाव निर्मूलन करण्यासाठी वापरण्याची परवानगी मिळावी, व्हेंटिलेटर व्यवस्थापक, चालक, आरोग्य त्रुटी भरून काढण्यासाठी शासनाची मदत मिळावी यासाठी सरपंच एकत्र आले होते. 

दरम्यान जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके आणि जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी जुन्नर तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मांडला. तेव्हा आमदार बेनके यांनीही तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगातील मिळणाऱ्या निधी पैकी २५ टक्के निधी कोरोना प्रादुर्भाव निर्मूलनासाठी देण्याची तयारी असल्याचे वळसे पाटील यांना सांगितले आहे.

तिसऱ्या लाटेला वेशीवरच रोखणार !

जुन्नर तालुक्यातील सरपंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटे साठी सज्ज झाले असून, कालच मुख्यमंत्री ठाकरे यांनी ग्रामीण भागातील कोरोना वाढतोय अशी चिंता व्यक्त केली होती. त्याचबरोबर हिवरे बाजार चे सरपंच पोपटराव पवार आणि सोलापूर मधील तरुण सरपंच ऋतुराज देशमुख या सरपंचांनी कोरोनाला रोखले आहे. गावोगावी असेच कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालो तर राज्यात कोरोनाला रोखण्यात यशस्वी होऊ असे सांगितले होते. त्याला आज जुन्नर तालुक्यातील गांव कारभाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. 

या बैठकीत नारायणगाव चे सरपंच योगेश पाटे, वारूळवाडी चे सरपंच राजेंद्र मेहेर, कांदळीचे सरपंच विक्रम भोर, धनगरवाडी चे सरपंच महेश शेळके, शिरोली चे सरपंच प्रदीप थोरवे, खिलारवाडी चे सरपंच दिलीप खिलारी, वडजचे सरपंच सुनील चव्हाण, गुंजाळवाडी चे सरपंच रमेश ढवळे, ठिकेकरवाडीचे सरपंच संतोष ठीकेकर, आर्वीचे सरपंच रेश्मा वायकर, आहिनेवाडीचे सरपंच भीमाताई खंडागळे, उंब्रजचे सरपंच सपना दांगट, सविता ठोसर, माया डोंगरे, वंदना गाढवे हे उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय