Friday, May 3, 2024
Homeग्रामीणजुन्नर : ग्रामपंचायत जळवंडी अंतर्गत उसराण येथे रोजगार हमीची कामे सुरू

जुन्नर : ग्रामपंचायत जळवंडी अंतर्गत उसराण येथे रोजगार हमीची कामे सुरू

जुन्नर : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना कायदा – २००५ अंतर्गत ग्रामपंचायत जळवंडी मधील उसराण गावामध्ये शिवकालीन टाकीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

ग्रामीण आदिवासी भागांमध्ये ‘धरण आमच्या उशाला तरीही कोरड आमच्या घशाला’ अशी परिस्थिती आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली तरीही जनावरांना पिण्यासाठी आणि दैनंदिन इतर वापरासाठी पाणी टंचाई कायम भासत असते. शेतीसाठी पाणी मिळणे तर दूरच, शासनाच्या विविध योजनांमधून पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी विहिरी, तळे, शिवकालीन टाक्या निर्माण झाल्या. आणि काही वर्षातच हे पाणवठे गाळाने भरून गेल्याने पाणी साठा होण्याची समस्या निर्माण झाली. यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि मजुरांनी शासनाच्या ‘मागेल ते काम’ या घोषणेनुसार सार्वजनिक पाणवठे मधील गाळ काढण्याच्या मागणीला प्राधान्य दिले. आणि खडकुंबे गावातील एका तळ्यातील गाळ काढून पूर्ण झाल्यावर उसराण येथील शिवकालीन टाकीतील गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे गरजवंतांना रोजगार मिळाला आणि पाणी साठवणुकीसाठी तळ्यातील गाळ उपसा करण्यात येऊन पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.

पुढाऱ्यांनो भाषणांना आवर घाला….लग्न समारंभात शुभ आशीर्वाद लांबतोय

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

यावेळी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ रोजगार हमी योजनेतुन मिळावे. या मागणीसाठी पाठपुरावा करणार आहे.

तसेच शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी शंभर टक्के अनुदानावर ताडपत्री मिळावी यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतीसाठी पाणी मिळेल, जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा शेतकरी उपलब्ध करू शकतील. दूध व्यवसायाची वाढ होऊन शेतकरी संपन्न होतील, फळबाग लागवड करता येऊ शकेल काही शेतकरी व्यवसाय करतील, असेही निगळे म्हणाले.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 261 पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !


विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांसाठी, आजच करा अर्ज !

किसान सभेचे तालुका सचिव लक्ष्मण जोशी यांनी मजुरांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की रोजगार हमी योजनेअंतर्गत गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने पश्चिम भागातील गावांमध्ये रोजगार हमी कामे करून रोजगार मिळत आहे. अनेक गावांमध्ये पायाभूत सुविधा विकास होताना दिसतोय. ग्रामीण भागात मुख्य पिण्याच्या आणि शेतीचा पाण्याची सोय करणे अत्यंत आवश्यक आ.हे रोजगार हमीतून ते शक्य आहे.

यावेळी रोजगार सेवक नारायण वायाळ, मनरेगा मजूर अमित वायाळ, वैशाली सरोगदे, सुमन करवंदे, निलेश सरोगदे, तानाजी सरोगदे, दुदा वायाळ, आशा वायाळ अनिता साबळे, मनीषा सरोगदे, सोमाबाई बेंढारी, सुनीता बेंढारी, यशोदा मुदगुण, रामचंद्र वायाळ हे उपस्थित होते.

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 261 पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात तब्बल 105 जागांसाठी भरती, आजच करा अर्ज !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, ‘या’ तारखेला मुलाखत


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय