Thursday, July 18, 2024
Homeराज्यदेशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार, भाजपच्या जोर-बैठका सुरू !

देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळणार, भाजपच्या जोर-बैठका सुरू !

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे पुढचा राष्ट्रपती कोण होणार याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. वेगवेगळी समीकरणेही मांडली जात आहेत. भाजपा तर 2024 च्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राष्ट्रपदीपदासाठी आदिवासी उमेदवार देण्याचा विचार करत आहे.

भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी नुकतीच एक बैठक झाली. त्या बैठकीत या मुद्दय़ावर चर्चा झाली. त्यात आगामी निवडणुकीचे गणित मांडताना राष्ट्रपतीपदी आदिवासी उमेदवार द्यावा असा मुद्दा मांडला गेला. लोकसभेच्या 543 जागांपैकी 47 जागा या अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. 62 लोकसभा मतदारसंघांमध्ये आदिवासी समाजाचा प्रभाव आहे. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर अंतर्गत 1044 जागांसाठी भरती, 10 वी / 12 वी / ITI विद्यार्थ्यांना संधी !

मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि गुजरातमध्ये तर आदिवासींची मते ही निर्णायक ठरतात. यावर्षी गुजरातमध्ये तर पुढच्या वर्षी छत्तीसगढमध्ये निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपदीपदी आदिवासी उमेदवार दिल्यास त्याचा फायदा या निवडणुकाRमध्ये निश्चितच होऊ शकतो.

राष्ट्रपतीपदासाठी भाजपामध्ये अनेक आदिवासी नेत्यांच्या नावांची चर्चा आहे. त्यात पेंद्रीयमंत्री अर्जुन मुंडा, जुएल ओराम, माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू, छत्तीसगढच्या राज्यपाल अनसुईया उईके यांचा समावेश आहे.

टोमॅटो शंभरी पार ; शेतकरी सुखावला !

कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 261 पदांसाठी भरती, असा करू शकता अर्ज !

पशुसंवर्धन विभागातील तब्बल ‘इतकी’ रिक्त पदे भरणार

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय