Saturday, May 4, 2024
Homeजुन्नरजुन्नर : संदीप मुंढे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर : संदीप मुंढे यांच्याकडून शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर : राजूर (ता.जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मुंढेवाडी येथील विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष संदीप मुंढे यांच्याकडून गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

मुंढे म्हणाले, या शाळेत गरीब, गरजू आणि आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असतात, त्यांच्या शिक्षणाचा खर्च कमी व्हावा या उद्देशाने पुस्तके व वह्या वाटप करण्यात आले. शालेय साहित्य वाटपानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

यावेळी काळू मांडवे, सदू मांडवे, सखाराम मांडावे, होनाजी मुंढे, दीपक राघतवान, सुभाष मुंढे, रोहिदास पोटे, अजय पोटे, बारखु मांडवे, बारखु मुंढे, बाळू मुंढे, कैलास मुंढे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय