Sunday, May 19, 2024
Homeजुन्नरजुन्नर : शिरोली पुर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर : शिरोली पुर येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

जुन्नर / आनंद कांबळे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली पुर या ठिकाणी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने एकत्र येवून आनंद कांबळे यांच्या माध्यामातून विलास किरोते, राजेंद्र गायकवाड, सुनिल अंबिके, डॉ.पूनम पवार, देवराम कोठारे यांच्या सौजन्याने विद्यार्थी व शाळेसाठी विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते विलास किरोते, राजेंद्र गायकवाड, देवराम कोठारे यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकुंबे केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख शेळके होते.

या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच उषा चिमटे, मारुती दिघे, बाळू दिघे, सुदाम दिघे, विद्या दिवटे ग्रामपंचायत सदस्य बाळू दिघे, जानकू बांबळे, गंगाराम लांघी, पुष्पा घिगे, निलमताई आंबवणे, काळू लांघी, किसन आंबवणे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन पोपट दिघे, पुनाजी दिघे, लहू दिघे, अविनाश दिघे, आनंदा दिघे, भरत दिघे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक अंकुश साबळे यांनी केले तर आभार दत्तात्रय भोईर यांनी मानले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय