Friday, July 12, 2024
Homeजुन्नरजुन्नर : वाढदिवसानिमित्त थंडीत गोरगरिबांना ब्लँकेट वाटप, समाजासमोर ठेवला आदर्श

जुन्नर : वाढदिवसानिमित्त थंडीत गोरगरिबांना ब्लँकेट वाटप, समाजासमोर ठेवला आदर्श

वाढदिवसानिमित्त थंडीत गोरगरिबांना ब्लँकेट वाटप

नारायणगाव : वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा सहसचिव गणेश वाव्हळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुन्नर तालुक्यात विविध गावांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.

यामध्ये थंडीच्या काळात गोरगरिब, गरजूंना ब्लँकेटचे वाटप करत समाजासमोर एक आगळावेगळा आदर्श ठेवला आहे.

तसेच यानिमित्ताने येडगाव येथील नेहरवस्तीत वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन पुणे जिल्हा अध्यक्षा सीमा भलेसईन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अनेक कार्यकर्ते व महिलांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला.

नेहरवस्तीत वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन

यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सीमा भलेसईन प्रियांका लोंढे महासचिव, प्रशांती साळवे सचिव, मालती बडेकर उपाध्यक्ष, संजय साळवे हवेली तालुका अध्यक्ष, प्रा. किशोर चौरे, वंचित बहुजन महिला आघाडी जुन्नर तालुका अध्यक्ष निलम खरात, उपाध्यक्ष पूजा जगताप, उपाध्यक्ष पूजा सोनवणे, उपाध्यक्ष कविता शेलार, कार्याध्यक्ष दिपाली थोरात, ग्रा.पं.सदस्य अक्षय वाव्हळ तसेच संगमनेर तालुक्यातून आलेले मंदाकिनी मेंगाळ दलित महासंघ संगमनेर तालुका उपाध्यक्ष, वैशाली चौरे, रेश्मा वाव्हळ, 

वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुका महासचिव सागर जगताप, महासचिव महेश तपासे, उपाध्यक्ष फिरोज पटेल, संतोष डोळस, सचिव अल्पेश सोनवणे, सहसचिव विनायक रणदिवे, आरीफ पटेल, प्रसिद्धी प्रमुख संदेश वाव्हळ, भारतीय बौद्ध महासभा संघ जुन्नर तालुका अध्यक्ष अतिष उघडे, महासचिव अरविंद पंडित आंबेडकर प्रतिष्ठान चे संस्थापक गणेश बिंबाजी वाव्हळ, अध्यक्ष दिनेश वाव्हळ, सुरेश डोळस, राजेंद्र भालेराव, अनिल मधे, योगेश शिंदे, संदिप घायतडके, रमेश साबळे, अमर सोनवणे, संदीप सप्रे, उमेश सोनवणे, गाडी घुंगराची फेम विलास अटक हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय