Thursday, February 13, 2025

नृत्यशरा डान्स स्टुडिओची दापोलीत शानदार सुरवात

नृत्यशरा डान्स स्टुडिओचे कलाकार व प्रतिनिधी

दापोली : कोरोना महामारीमुळे गेली पावणे दोन वर्षे बंद असलेले दापोलीतील प्रसिद्ध असे नृत्यशरा डान्स स्टुडिओ 1 जानेवारी 2022 पासून नव्या उत्साहात व नव्या उमेदीने  सुरू करण्यात आले आहे. 

प्रियंका इदाते भरतनाट्यम् विशारद यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत स्टुडिओची पुन्हा दमदार सुरवात करण्यात आली आहे. 

भरतनाट्यम् क्लासिकल डान्स ,झुंबा इत्यादी डान्स व महिलांच्या फिटनेस संबंधित क्लासेस येथे घेतले जातात.या डान्स  स्टुडिओत 100 पेक्षा अधिक मुलांनी प्रवेश घेतला असून काही महिलांनी सुद्धा येथे फिटनेस साठी प्रवेश घेतलेला आहे. डान्स क्लास सुरू केल्यामुळे विद्यार्थी व पालक आनंदीत झाले आहेत. मुलांना डान्स स्टुडिओच्या कोरयोग्राफर प्रियंका इदाते ह्या उत्तम रित्या डान्स शिकवितात. त्यामुळे मुलंसुद्धा डान्स क्लास सुरू केल्यामुळे खूश झाली आहेत. डान्स स्टुडिओला पालकांकडून चांगले सहकार्य मिळत आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार  शनिवार संध्याकाळी 5.30 ते 6.30 व रविवार सकाळी 9.30 ते 11.30 अशा डान्स क्लासेसच्या बॅचेस ठेवण्यात आले आहेत. नवीन प्रवेशकांनी प्रियंका इदाते 8828492264, 7507066042 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

नवीन प्रवेशासाठी स्टुडिओतर्फे आवाहन

              

या स्टूडीओत योगा प्रशिक्षण सुद्धा सुरू करण्यात आले आहे. सायली इदाते या योगा शिक्षिका ह्या योगाचे प्रशिक्षण देणार आहेत. सायली इदाते ह्या योगा शिक्षिका त्याचबरोबर नॅचरोपॅथीक ट्रेनर सुद्धा आहेत. त्यांनी कालिदास विद्यापीठ नागपूर येथे योगशास्त्राचे एम.ए. शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे उत्तम योग प्रशिक्षण त्यांच्या कडून मिळणार आहे. दिवसातून तीन बॅचेसचे वेळापत्रक त्यांनी जाहीर केले आहे. सकाळी 7.00 ते 8.00 पहिली बॅच, सकाळी 8.00 ते 9.00 दुसरी बॅच व संध्याकाळी 4.00 ते 5.00 तिसरी बॅच अशा क्लासेसचे बॅच सोयीनुसार ठेवण्यात आले आहेत. ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी 9527619231 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

नृत्यशरा डान्स स्टुडिओ पत्ता मयूर मधूकर घाटगे निवास, विठ्ठल मंदिर च्या मागे,कन्या शाळेजवळ कोकंब आळी दापोली जिल्हा रत्नागिरी असा आहे. दापोलीत जास्तीत जास्त प्रवेशकांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन नृत्यशरा डान्स स्टुडिओ तर्फे करण्यात आले आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles