Junnar (आनंद कांबळे) : श्री शिव छत्रपती महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत १०१ विविध फळझाडांची लागवड, पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी महाविद्यालयीन परिसरामध्ये करण्यात आली.
आपण सर्व सह्याद्रीच्या छत्रछायेत वास्तव्य करीत असून सह्याद्रीतील जैवविविधता अबाधित राखणे आपले प्रथम कर्तव्य आहे. महाविद्यालयातील टेकडीवर झालेले हे वृक्षरोपण भविष्यात होणारी मृदेची धूप कमी करून भूजल साठा वाढवण्यास मदत होईल. तसेच परिसरामध्ये नवीन जैव विविधता विकसित होऊन पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम या माध्यमातून साकारले जाईल असा विश्वास प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनी व्यक्त केला. (Junnar)
या कार्यक्रमासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. विलास कुलकर्णी, यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे, उपप्राचार्य डॉ. रविंद्र चौधरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र कोरडे, प्रा. डॉ. सुप्रिया काळे, प्रा. जयश्री कणसे, प्रा. मयूर चव्हाण, प्रा. सचिन आल्हाट, प्रा. विष्णू घोडे यांनी केले.
Junnar
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती