लेण्याद्री (जुन्नर) : सध्या कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढतेय या पार्श्वभूमीवर आमदार अतुल बेनके यांनी लेण्याद्री कोविड केअर सेंटर याठिकाणी आज भेट दिली व आरोग्य यंत्रणेची पाहणी केली.
यावेळी सेंटर चे प्रमुख आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स आणि स्टाफ तसेच रुग्णांशीही संवाद साधला. तसेच याठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांचाही आढावा घेतला.
यावेळी आ. बेनके म्हटले कि , ‘तालुक्यातील सुजाण जनतेला आवाहन करतो की, सध्या एकीकडे लसीकरण चालू आहे परंतु तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टंसिंग चा वापर करावा व प्रशासनास सहकार्य करावे.’
यावेळी तहसीलदार हनुमंत कोळेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश गोडे, गटविकास अधिकारी शरद माळी, भाऊसाहेब देवाडे यांच्यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.