जुन्नर (पुणे) : आज तालुक्यातील पश्चिम भागातील घाटघर येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण मोहिमेस नागरिकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी वय वर्षे ४५ वरील नागरिकांना कोरोनाचे लसीकरण करण्यात आले.
या मोहीमेत आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रदिप गोसावी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गणेश मुंढे, आरोग्य साहाय्यक शिवाजी सानप, आरोग्य सेवक दिपक राऊत, संदिप मुंढे, आरोग्य सेविका श्रीमती धुळे व श्रीमती. मुल्ला, अशा सुपरवायझर मिरा कुडेकर तसेच आशा आसवले सहभागी झाले होते. या मोहीमेत ४५ वर्षा पुढील २१५ नागरिकांनी कोरोनाची लस घेतली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, प्रशासकीय अधिकारी अशोक लांडे, माजी सरपंच चंदर शिंगाडे, उपसरपंच बुधा बुळे, मोहन रावते, अनंता रावते उपस्थित होते.
आज तालुक्यातील ३७ केंद्रात लसीकरण करण्यात आले. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, जुन्नर ग्रामीण रुग्णालय आणि डिंगोरे, बल्लाळवाडी, अणे, ओझर, मांजरवाडी, शिरोली बुद्रुक, बेलसर, मुथाळणे, पिंपळगाव जोगा, केवाडी, उंब्रज नं. १, बोरी बुद्रुक, वडज, पारुंडे, पिंपरी पेढार, घाटघर, पाडळी व पारगाव तर्फे आळे उपकेंद्राचा समावेश आहे. तसेच नारायणगाव २, आळेफाटा ३ व जुन्नर शहरातील एका खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात आले.
(बातमी संकलन – शिवाजी लोखंडे)