Sunday, December 8, 2024
Homeजिल्हाप्रा. नंदकुमार उदार यांना सावित्रीबाई फुले पुणे ‘विद्यापीठाची, डॉक्टरेट पदवी प्रदान

प्रा. नंदकुमार उदार यांना सावित्रीबाई फुले पुणे ‘विद्यापीठाची, डॉक्टरेट पदवी प्रदान

अहमदनगर (डॉ. कुंडलिक पारधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रा.नंदकुमार भाऊसाहेब उदार यांना पीएच. डी. ही पदवी नुकतीच प्रदान केली आहे. 

त्यांनी “मराठीतील साहित्य संमेलने: एक अभ्यास” या विषयावर आपला शोधप्रबंध विद्यापीठाला सादर केला होता. त्यांना या संशोधनकार्यासाठी, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयातील डॉ.राजाभाऊ भैलुमे यांनी मार्गदर्शन केले. 

नंदकुमार उदार यांनी मराठी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या संशोधन केंद्रातून आपले संशोधन पूर्ण केले असून ते सध्या न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स कॉलेज, पारनेर, जि. अहमदनगर येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव – ॲड विश्वासराव आठरे पाटील,  खजीनदार मुकेश मुळे, ज्येष्ठ विश्वस्त सीताराम खिलारी, पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य राहुल झावरे पाटील, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी अभिनंदन केले.


संबंधित लेख

लोकप्रिय