जुन्नर : देशभरात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा विस्फोट होताना दिसत आहे. तालुक्यात मागील २४ तासात १३६ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत.
यामध्ये जुन्नर नगरपालिका १२, वारूळवाडी १७, हिवरे बु.१४, ओतूर १२, आळे १२, नारायणगाव ११, पिंपरी पेंढार ५, निमगावसावा ४, सावरगाव ४, पिंपळवंडी ३, बोतार्डे ३, ओझर ३, केवाडी २, ओरंगपूर २, निमगाव तर्फे म्हाळुंगे २, मांगरुळ २, धालेवाडी २, नेतवड २, चाळकवाडी २, बादशहा तलाव २, शिरोली बु. २, संतवाडी १, वडगाव आनंद १, पाडळी १, राजूर नं.२ (१), आपटाळे १, आणे १, बेल्हे १, पारगाव तर्फे आळे १, साकोरी १, मांजरवाडी १, वडज १, तांबे १, आर्वी १, डुंबरवाडी १, वडगांव कांळी १, हापूसबाग १, पिंपळगाव सिध्दनाथ १, बांगरवाडी १ यांचा समावेश आहे.
तालुक्यातील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ६७२ झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६ हजार ६७५ तर आता पर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २७३ असून सध्या तालुक्यात ७२४ ऍक्टिव करोना रुग्ण आहेत.