Friday, November 22, 2024
Homeपर्यटनजुन्नर, भिमाशंकर परिसर पर्यटन बंदीमुळे ओसाड, आदिवासींचा रोजगार बुडाला.

जुन्नर, भिमाशंकर परिसर पर्यटन बंदीमुळे ओसाड, आदिवासींचा रोजगार बुडाला.

पुणे (प्रतिनीधी) : जुन्नर, भिमाशंकर परिसर पर्यटन बंदीमुळे ओस पडला आहे. पर्यटनातून या भागातील आदिवासींंना काही प्रमाण रोजगार निर्माण होत असे, परंतु तो आता पुर्णतः बुडाला आहे.

जुन्नर तालुक्यातील शिवनेरी, नाणेघाट, माळशेज घाट, ओझर, लेण्याद्री, चावंड, जीवधन आदी ठिकाणी पावसाळ्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते. तसेच भीमाशंकर परिसरातील निसर्गरम्य वातावरणात अनेक ठिकाणी धबधबे वाहत आहेत. त्यामध्ये कुशिरे धबधबा हा तळेघर पासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. तसेच माळीणपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे. पर्यटन बंदी जरी असली तरी हे धबधबे मात्र वाहू लागले आहेत. 

दरवर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी असते यावर्षी कोंढवळ धबधबा, पाटण धबधबा,  कुशिरे धबधबा, बोरघर धबधबा, आहुपे, हातवीज सह्याद्रीची रांंग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. मात्र या लॉकडाऊनमुळे सध्या पर्यटकांना पर्यटन बंदी असल्यामुळे या भागात पर्यटक दिसत नाही.

उन्हाळ्यात पूर्वपट्ट्या रोजगारासाठी जाणारा आदिवासी समाज लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यात पुन्हा पर्यटनबंदी अशा बिकट परिस्थितीत आदिवासी समाज अडकला आहे. हिरडा हे वनउपज उत्पन्नाचे साधन, परंतु चक्रीवादळामुळे हिरड्याचे ही नुकसान झाले आहे.

अशा दुहेरी संकटात सापडलेल्या आदिवासी समाजाला मदतीची गरज आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या पुढाकाराने आणि पुणे जिल्हा परिषदेच्या विशेष अभियानामुळे जुन्नर, आंबेगांव तालुक्यातील काही गावात मनरेगा योजनेतून अनेकांच्या हाताला काम मिळाले.

अखिल भारतीय किसान सभेने लॉकडाऊन काळात प्रति महिना  किमान १० हजार रुपये आर्थिक सहाय्य द्यावे, चक्रीवादळामुळे झालेले नुकसानाची नुकसान भरपाई त्वरीत द्या आदी मागण्या केल्या आहेत. तर बिरसा क्रांती दलाने हिरड्याची खरेदी ५०० रूपये प्रतिकिलो दराने करण्याची मागणी केली आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय