Friday, November 22, 2024
Homeग्रामीणजुन्नर : ५० हजाराच्या हप्ता प्रकरणी तलाठी जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जुन्नर : ५० हजाराच्या हप्ता प्रकरणी तलाठी जाळ्यात, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

जुन्नर (पुणे) : वाळूच्या गाड्या चालू ठेवण्यासाठी प्रत्येक गाडीमागे ५० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या तलाठी सुधाकर वावरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. वावरे यांच्यांवर झालेल्या कारवाईने तालुक्यातील तहसीलदार कार्यालय तसेच तलाठ्यामध्ये खळबळ उडाली आहे. 

जुन्नर येथील कार्यालयात कार्यरत असणारे सुधाकर वावरे वरीष्ठांची मर्जी राखत अनेक गैरप्रकार करत होता. तसेच त्यांच्याविरोधात गैरप्रकार करण असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच महसूल अधिकारीही पाठिशी घात असल्याचे बोलले जात हैते, अखेर कारवाई झाल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय