जुन्नर : जुन्नरमधील १४ वर्षीय शाळकरी मुलाने आपल्या राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सर्वेश भारत भाईक, रा. लोणार आळी जुन्नर असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव असून तो शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता. त्याने दि. १३ रोजी आपल्या राहत्या घरात कोणीही नसताना ओढणीच्या सहाय्याने खिडकीच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची आई राजश्री भाईक यांनी या घटनेची खबर जुन्नर पोलिसांना दिली. त्या प्राथमिक शाळा गोळेगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
पोलिसांनी आकस्मात मयत म्हणून नोंद केली असून यापुढील तपास पोलीस अंमलदार महेश भालेकर करीत आहेत. १४ वर्षीय शाळकरी मुलाने केलेल्या या आत्महत्येच्या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली आहे.