Friday, October 18, 2024
Homeताज्या बातम्याJitendra Awhad : जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा...

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

Jitendra Awhad : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात असून राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड हे चांगलेच आक्रमक झाले आहे.

राज्य सरकारच्या भुमिके विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी दोन दिवसांपुर्वी मनुस्मृतीचे दहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज महाड येथे जाऊन मनुस्मृतीचे दहन करण्यात येणार आहे. या पार्श्वभुमीवर पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावल्या आहेत. या संदर्भातील माहिती स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया एक्स वरून दिली आहे.

Jitendra Awhad यांची सोशल मीडिया पोस्ट

जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहले आहे कि, पोलिसांनी कुठली तरी एक नोटीस आमच्या कार्यकर्त्याला दिली आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, “मनुस्मृती दहन केल्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या जातील”. काही लोकं म्हणजे कोण ? याचा खुलासा पोलिसांनी जरूर करावा. हे दहन पहिल्यांदाच होत नाही. या पूर्वी म्हणजेच पहिल्यांदा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे वाचन करून दहन केले होते. लोकांना मनुस्मृती ‘आपली’ वाटू लागली अन् खासकरून पोलिसांना कसे कळू लागले की मनुस्मृती आपली मानणारे लोक महाराष्ट्रात आहेत. तेव्हा नोटीस द्या अथवा वाट्टेल ते करा; जो कार्यक्रम व्हायचा तो होईलच ! अशी पोस्ट आव्हाड यांनी मंगळवारी केली होती.

आज सकाळी आव्हाड मनुस्मृतीच्या दहनासाठी महाडच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी त्यांनी पुन्हा एक टाकत म्हटले आहे की, मनुस्मृती मध्ये अस्पृश्य, शूद्र व स्त्रियांबद्दल अन्यायकारक काही कायदे/श्लोक सुद्धा आहेत. या ग्रंथामुळे जातिव्यवस्था, अस्पृश्यता, जातिबंधने बळकट झालेली होती. त्यामुळे महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी सर्वप्रथम ‘मनुस्मृती’ ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते.

शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर हे म्हणतात की, “मनुस्मृतीमधील काही चांगले, बौद्धिक बळ देणारे श्लोक आम्ही शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करणार आहोत.” एकीकडे जातीद्वेष, जातीभेद, अस्पृश्यता आणि समाजातील सर्वच वर्गातील स्त्रियांबाबत अन्यायकारक असणाऱ्या मनुस्मृतीमधील काही गोष्टी केसरकर यांना आवडायला लागल्या आहेत. उद्या यांना सबंध मनुस्मृती आवडायला लागेल. मला माहित आहे की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि केसरकर यांची तुलनाच होऊ शकत नाही. जिथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पुस्तक हीन आणि मानवतेविरोधात आहे, असे म्हटले आहे. तिथे त्या पुस्तकावर चर्चाच करणे अयोग्य आहे; ते ही महाराष्ट्रात! त्यामुळे केसरकर यांना किती कळतं, याबद्दल सबंध महाराष्ट्राला माहित आहे. अन् ते कुठल्या वर्गाचे प्रतिनिधित्व करतात, हेदेखील सबंध महाराष्ट्राला समजलेले आहे. आताच आम्ही महाडकडे निघालो आहोत. चलो महाड… पुन्हा एकदा मनुस्मृतीचे दहन करावेच लागेल. या सरकारला आपली ताकद दाखवावीच लागेल… बहुजनांनो, एक व्हा !#चालोमहाड

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

युनिट मुख्यालयाच्या कोट्यासाठी अग्निवीर भरती मेळाव्याचे आयोजन

सेल्फी जीवावर बेतली, नवविवाहिता शंभर फूट दरीत कोसळली

धक्कादायक : पुणे अपघात प्रकरण ; वेदांतचे ब्लड टेस्ट रिपोर्ट बदलण्यासाठी लाखोंचा व्यवहार

हवामान खात्याच्या “या” अंदाजाने सर्व सामान्यांना भरली धडकी

संबंधित लेख

लोकप्रिय