Saturday, May 18, 2024
Homeराज्यJEE, NEET आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा - SFI

JEE, NEET आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात यावा – SFI

 

सोलापूर (०२ सप्टें) : जेईई , नीट व अंतिम वर्ष परीक्षा पुढू ढकलण्यात यावेत, या मागणीला घेऊन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने आज निषेध निदर्शने करून नायब तहसीलदार संदीप लटके यांना निवेदन देण्यात आले.

आज ०२ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा या परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाच्या विरोधात देशव्यापी विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची हाक एसएफआय व डाव्या पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी दिली आहे. 

देशात कोरोना ( कोविड – १९ ) महामारीचे भीषण संकट समोर असताना दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने महाराष्ट्रासह देशभरात वाढत आहे. अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कसलीच काळजी न करता केंद्र शासनाने जेईई, नीट व अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. मोदी सरकारच्या अशा आडमुट्या भूमिकेला जोरदार विरोध करण्यासाठी देशातील सर्व विद्यार्थी संघटना व विद्यार्थी एकत्र येऊन या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. तसेच विद्यार्थ्यांच्या इतर महत्त्वाच्या शैक्षणिक मागण्या घेवून एसएफआय व डाव्या विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केले. 

JEE, NEET च्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अंतिम वर्षाच्या परीक्षा किमान दोन महिने पुढे ढकलण्यात याव्यात, परीक्षा घेण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा देखील विचार व्हावा. जसे की असाईटमेंटच्या माध्यमातून परीक्षा घेता येईल. ते सबमिट करण्यासाठी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कार्यलयात संगणक व इंटरनेटची व्यवस्था करता येईल. जेणेकरून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही, काही अपरिहार्य कारणास्तव काही विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा देता येत नसेल तर त्यांना तसा वेळ वाढवून देण्यात यावा, अपंग विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी विशेष सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, सरकारने परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रवासाची मोफत व्यवस्था करावी, परिक्षेदरम्यान सर्व विद्यार्थ्यांच्या मोफत निवासाची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात यावी, सर्व परीक्षा केंद्रे सॅनिटाईझ करावेत. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करावी. त्यांना महामारीची लागण होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात यावी, परीक्षा देण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये याची दक्षता घेण्यात यावी, परिक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना काही धोका निर्माण झाल्यास आरोग्य विमा देण्यात यावा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित १०८ महाविद्यालयातुन २२ हजार विद्यार्थी अंतिम वर्ष परीक्षा देणार असून या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी, आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी एसएफआय चे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, सहसचिव शामसुंदर आडम, पल्लवी मासन, दुर्गादास कनकुंटला, पूनम गायकवाड, अश्विनी मामड्याल, लक्ष्मी रच्चा, प्रिया कीर्तने इ. उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय