मी खुप वर्षापासून ऐकत आलो होतो आणि आता पहातोय तुकाराम मुंडे, श्रीकर परदेशी, आयुब खान हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून लोकांच्या मनामध्ये घर करून बसले आहेत. स्वतः गरीबीची झळा सोसलेल्या या अधिकाऱ्यांनी लोकहितासाठी अनेक वेळा बदल्या पत्करल्या आहेत, पण हे राजकीय नेते मृत्यू च्या टाळूवरचे लोणी खाणारे यांना लोकहितापुढे स्वतःचा स्वार्थ महत्वाचा वाटतो. यासाठी अनेक वेळा तुकाराम मुंढे यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची 20 ते 25 वेळा बदली केली आहे, त्यात सर्वच पक्ष आले कोणीही पाठीशी राहिले नाही. सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष सगळेच एका माळेचे मणी म्हटले तर वावगे वाटणार नाही. श्रीकर परदेशी सारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला पीएमओ कार्यालयात त्यांची बढती देऊन त्यांचे तोंड बंद केले. आयुब खान यांच्या सारख्या डाॅक्टरवर नको ते आरोप लावून त्यांना जेल मध्ये पाठविले आणि निष्पाप जिवावर बलात्कार करणाऱ्या कुलदिप सेंगरला मात्र पाठिशी घालायचे काम सत्ताधाऱ्यांनी केले.
आता उरले ते सर्वसामान्य जनतेचे लाडके कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंडे यांना पण आता धारेवर धरत आहेत. त्यांच्या प्रत्येक लोकहिताच्या कामात अडथळे निर्माण करत आहेत, पण नागपूरच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता तुकाराम मुंढे यांच्या पाठिशी उभी आहे. आज प्रत्येक नागरिकाला स्वतःचे चांगल कशात आहे, हे माहिती आहे. त्यामुळे तुकाराम मुंढे यांना कितीही बदल्या केल्या तरी ते डगमगणार नाहीत, कारण त्यांनी जनतेचा खुप मोठा विश्वास त्यांनी जिंकला आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांना वाटते तुकाराम मुंडे जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचे औद्योगिक करण्यास कोणीही रोखू शकणार नाही, तुकाराम मुंढे यांच्या सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी महाराष्ट्राला लाभले हा अभिमानच म्हणावा लागेल.
– सूर्यकांत कांबळे
संस्थापक अध्यक्ष स्वराज्य युवा संघटना
गडहिंग्लज, कोल्हापूर.