एखाद्या जीवाचा जन्म हा ना कोणत्या तिथीवर अवलंबुन असतो, ना कि कोणत्या सम-विषम तारखेवर, ना कोणत्या नक्षत्रावर पण याच गोष्टीवर आपण सर्व विश्वास ठेऊन या संदर्भात वक्तव्य करणाऱ्यांना चालना देत असतो. एक अविश्वसनीय तर्क मनात जोपासत असतो. पण कधी विचार केलाय एखादा जीव जन्माला येण्यासाठी सम-विषम, नक्षत्र अथवा तिथी अवलंबुन नसते, तर ते नैसर्गिक नियमांच्या आधारावर असलेल्या प्रक्रियेवर अवलंबुन असतं.
अध्यात्मिकदृष्ट्या एखाद्या धर्मग्रंथामध्ये जरी असे नियम लिहलेले असतील जे पुर्णतः प्रकृतीच्या विरोधात आणि मानवी जीवाला धोका पोहोचवणारे असतील तर तो धर्मग्रंथच अयोग्य आहे, कारण विविध धर्मांची शिकवण अथवा त्यामधील काही तत्वे बहुधा नैसर्गितेचं उल्लंघन करणारे असतात मग अश्या धर्मग्रंथांवर पाणी सोडलेल बरे नव्हे का? तर योग्यच असणार आहे. नैसर्गिक प्रक्रिया ही ना कोणत्या पुस्तकातुन बदलली जाणार, ना कोणत्या धर्मग्रंथातुन, नैसर्गिक प्रक्रिया ही पुर्णतः वास्तविकतेशी जोडलेली आहे, ती ना कधी बदललेली आहे ना कधी बदलणार आहे, त्यामुळे या अश्या विचारांना चालना देऊ नये तर त्या विरोधात आपलं मत मनाशी पक्क करुन या प्रबोधनकर्त्यांना धडा शिकवुन वास्तविकतेला वाचवल पाहिजे नाहीतर एक गैरसमज हा संपुर्ण जीवांच्या अस्तित्वाला नष्ट करु शकतो.
– रामदास जोशी
जुन्नर, पुणे