Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडजनभूमी विशेष : "जलक्रांती अभियान" ची कळकळीची हाक.

जनभूमी विशेष : “जलक्रांती अभियान” ची कळकळीची हाक.

भूजल पातळी खोल जाण्याचे कारण वृक्ष संख्या घटली हे आहे त्यामानाने वृक्षारोपण कमी होत आहे आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे कोट्यावधी बोअरवेल द्वारा रोज प्रचंड प्रमाणात भूजल उपसा सुरू आहे. मात्र त्यामानाने भूजल पातळीत वाढ होईल असे प्रयत्न फार कमी होत आहेत. दिवसेंदिवस भूजल पातळी कमी होत चालली आहे यावर उपाय म्हणून वैयक्तिक पातळीवर भूजलात वाढ होण्यसाठी वाहून जाणारे पाणी जल शोषखड्डा व बोअरवेल द्वारा जमिनीत खोलवर साठवणे गरजेचे आहे. माझ्या घरी मी हा प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.



पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने भूजल पुनर्भरण, वृक्षसंवर्धन व प्रदुषण व्यवस्थापन यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्या पृथ्वीच्या आणि सजीवांच्या भल्यासाठी वृक्षारोपण करणे आणि झाडे जगविणे फारच गरजेचे आहे, वापरुन फेकलेले प्लास्टिक व औद्योगिकरणाचा कचरा यांमुळे भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश यांच्या प्रदुषणाचा स्तर सजीवांना धोकादायक झालेला आहे. कोट्यावधी बोअरवेल द्वारा रोज पाणी उपसून काढल्यामुळे भूजल पातळी कमी होत चालली आहे.



पाणी हा पर्यावरणाचा श्वास आहे. “भूजल पातळी वाढविण्याचा उत्तम खात्रीशीर १००% यशस्वी पर्याय म्हणजे वाहून जाणारे पाणी विहीर, हॅंडपंप, बोअरवेल पासून २० फुटांवर केलेल्या जलशोषखड्डा द्वारे जमिनीत खोलवर साठवावे. हा यशस्वी प्रयोग माझ्या घरी मी केलेला असून बोअरवेल ला कधीच पाणी कमी होत नाही.या पद्धतीने प्रत्येक गाव जलसमृद्ध होणार आहे, हा विश्वास आहे. गावात समविचारी लोकांची एक टीम तयार करावी.

भूजल पुनर्भरण व्हावे यासाठी बॅंकेने पुढाकार घ्यावा.


भूजल पुनर्भरण व्हावे यासाठी विविध बॅंकेच्या शाखांमधून आपल्या ग्राहकांसाठी ठराविक रकमेची कर्ज योजना लागू करावी. आपल्या घरी अपार्टमेंटमध्ये असलेली विहीर बोअरवेल, जलशोषखड्डा तयार करून रिचार्ज प्रक्रिया करताना काही खर्च होतो. उदाहरणार्थ खोदकाम, गिट्टी, गोटे, विटा, गरजेनुसार प्लास्टिक पाईप रेती सिमेंट व मजूरी अंदाजे पंधरा ते वीस हजार रुपये खर्च होतो. बर्याच लोकांना असा खर्च नकोसा वाटतो, कारणे काहीही असो पण नेमके हेच काम राहून जाते.

वास्तविक देशातील प्रत्येक विहीर व बोअरवेलची रिचार्ज प्रक्रिया पूर्ण करणे कायद्याने बंधनकारक करण्यात यावे, तसा कायदा पारित करण्यात यावा. यामुळे वाहुन जाणारे पावसाचे पाणी जलशोषखड्डा द्वारे जमिनीत खोलवर साठवता येईल.कायद्याचे बंधन आणि कर्ज योजना उपलब्ध असल्याने प्रत्येकाला भूजल पुनर्भरण प्रक्रिया पूर्ण करणे सहजशक्य होईल. ही एक सोपी आणि १००% यशस्वी प्रक्रिया आहे.सगळ्या सोसायटी, नागरी सहकारी बँका खाजगी आणि सरकारी बॅंकेच्या शाखांमधून ठराविक रकमेची कर्ज योजना नियमानुसार लागू करावी. कृपया या संबंधीची चर्चा होऊन पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती व्हावी.या प्रयत्नांमुळे भूजल पातळी वाढवण्यासाठी मदत होईल.


सुहास सोहोनी जलक्रांती अभियान, अमरावती
9405349354

सुहास विनायक सोहोनी,

पत्ता :-सोहोनी कॉम्प्लेक्स,विवेकानंद कॉलनी,अमरावती-444606,

फोन-0721-2567463,

मोबा:-9405349354

बी.एस.सी, डिप्लोमा: मार्केटिंग मॅनेजमेंट-निवृत्त डेव्हलपमेंट ऑफिसर, नेशनल इन्शुरन्स कंपनी लि.



संपादन – क्रांतीकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय