Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडएस.एम.जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा

एस.एम.जोशी कॉलेजमध्ये आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा

हडपसर : पृथ्वीवरची चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. याच कारणामुळे चिमणी या पक्ष्याच्या संरक्षणासाठी 20 मार्च हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने चिमणीचे महत्त्व समजावून सांगितले जाते. तसेच चिमण्यांसाठी काय करता येईल यासाठी मार्गदर्शन केले जाते. चीनने 1958 ते 1962 या काळात उंदीर, माशा, डास आणि चिमणी हे चार प्रजाती नष्ट करून शेतीचे संरक्षण करण्याची मोहीम हाती घेतली होती. यामुळे चीनमधील चिमण्या नष्ट झाल्या. याचा पर्यावरणाच्या समतोलावर गंभीर परिणाम झाला. पुढची बरीच वर्षे चीनमधील लोकांना भयंकर उपासमारीला सामोरे जावे लागले. यानंतर जगभरातील पर्यावरणतज्ज्ञांनी चिमणी जगवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. हा इतिहास आपल्यासमोर आहे.

जगात 26 प्रकारच्या चिमण्या आहेत त्या चिमण्यांपैकी 5 प्रकारच्या चिमण्या भारतात आढळतात. चिमणी किटकभक्षी आहे. चिमणी ज्या प्रमाणात पिका मधलं धान्य खाते त्यापेक्षा जास्त उपद्रवी किटक खाते आणि शेतीचे अप्रत्यक्षपणे रक्षण करते. याच कारणामुळे चिमणीचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. मागील 25 वर्षात भौतिक प्रगती वेगाने झाली पण 867 प्रजातींच्या पक्ष्यांच्या संख्येत घट झाली. पर्यावरणाच्या समतोलाचा विचार केल्यास ही चिंतेची बाब आहे. तथापि चिमण्यांची संख्या कमी होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण चिमण्या मर्यादीत प्रमाणात शेतातील पिके खातात आणि मोठ्या प्रमाणात शेतातील किडे अळ्या यांचे भक्षण करतात. यामुळे पिकांचे रोगराईने नुकसान होण्याचे प्रमाण कमी होते. याच कारणामुळे चिमणी जगवणे आवश्यक असल्याचे पर्यावरणतज्ज्ञ सांगतात. 

भारतात शहरी भागांमध्ये चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. हळू हळू ग्रामीण भागातही चिमण्यांच्या संख्येत घट होऊ लागली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी व जनमानसामध्ये जनजागृती करण्यासाठी एस. एम. जोशी कॉलेज मधील प्राणिशात्र विभाग व इको- वॉररीयर नेचर क्लब (Eco-warrior Nature Club) यांचे संयुक्त विध्यमाने चिमणी दिन साजरा करण्यात आला. T.Y.B.Sc ( Zoology) आणि इको- वॉररीयर नेचर क्लब(Eco-warrior Nature Club) च्या विध्यार्थानी प्लस्टिक बाटल्या पासून बर्ड फीडर तयार करून कॉलेज कॅम्पस मधील झाडांना लटकावणे उपक्रम हाती घेतला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन. एस. गायकवाड यांनी विध्यार्थ्यांच्या चिमणी बचाओ उपक्रमबद्दल कौतुक केले. या उपक्रमांवेळी उपप्राचार्य प्रा.संजय जडे, डॉ.किशोर काकडे, प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. अशोक पांढरबळे, डॉ.हेमलता करकर, डॉ.सोपान आयनार, प्रा.अर्चना पाटील, प्रा.दीप्ती शेळके आणि विद्यार्थी उपस्थित होते.

LIC insurance corporation of India
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय