मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. याबाबतचे ट्विट करत निर्णय जाहीर केला आहे.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू करण्यास मान्यता दिली. लसींच्या दोन मात्रा न घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने क्लास उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
— Uday Samant (@samant_uday) April 6, 2022
कोरोनामुळे गेली दोन वर्षे महाविद्यालय, विद्यापीठ बंद होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर महाविद्यालय, विद्यापीठ पुर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी विद्यार्थी संघटना सातत्याने करत होत्या. आता विद्यापीठे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू होती.
त्याचबरोबर राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानांतर्गत (RUSA) 37 कोटी 58 लाख 33 हजार इतका निधी राज्य प्रकल्प संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची माहिती त्यांनी दिली आहे.