मुंबई : राज्य सरकारने आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मानधनात वाढीची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 रूपये वरून 10,000 रूपये तर मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 रूपये वरून 7200 रूपये करण्यात आले आहे.. तसेच मदतनीसांचे मानधन 4425 रूपये वरून 5550 रूपये करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली 20 फेब्रुवारी 2023 पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, मानधनात भरीव वाढ, मासिक पेन्शन, ग्रॅच्युइटी, नवीन मोबाईल, इंधनाचे दर व भाड्यात वाढ, आहाराच्या दरात वाढ आदी मागण्यांसाठी बेमुदत संपावर गेल्या होत्या. मानधन वाढीच्या आश्वासनानंतर संप मागे घेण्यात आला होता.