Monday, May 20, 2024
Homeराज्यआशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ; अधिवेशनात घोषणा 

आशा व गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ; अधिवेशनात घोषणा 

मुंबई : राज्यभरातील आशा व गटप्रवर्तकांना मानधनात वाढ केल्याची घोषणा आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारच्या वतीने अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

राज्यभरात ८१ हजार आशा स्वयंसेविका व ३ हजार ५०० गटप्रवर्तक गावपातळीवर आरोग्याच्या सुविधा देण्याचे काम करतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना अनुक्रमे ३८०० रूपये व ४७०० रूपये मानधन मिळते. त्यामध्ये अनुक्रमे आशा व गटप्रवर्तकांना प्रत्येकी १५०० रूपये वाढ करण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.

८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आशा व गटप्रवर्तकांनी महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली  आझाद मैदान मुंबई येथे मोर्चा व तिव्र निदर्शने केली. त्याला प्रतिसाद देत सबंध महाराष्ट्रातून आज आझाद मैदानावर आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांची प्रचंड ताकद उतरवली होती. सरकारच्या या निर्णयाचा आशा व गटप्रवर्तक फेडरेशन ने स्वागत केले आहे. 

याबाबत बोलताना आशा व गटप्रवर्तक फेडरेशनच्या नेत्या आनंदी अवघडे म्हणाल्या, लढ्याशिवाय काही मिळत नाही, आशा व गटप्रवर्तकांच्या लढ्याचे यश आहे. प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत राहणार आहोत.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय