Saturday, May 18, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडयोगामुळे दिव्यांगांच्या शारीरिक क्षमतेत वाढ - युगंधरा बर्वे

योगामुळे दिव्यांगांच्या शारीरिक क्षमतेत वाढ – युगंधरा बर्वे

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अभिसार फाउंडेशन वाकड येथील दिव्यांग मुलांच्या शाळेमध्ये योगासनाचे प्रात्यक्षिक करून घेण्यात आली. यावेळी दिव्यांग मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला.

सूर्यनमस्कार, पद्मासन, पवन मुक्तासन, पर्वतासन, ताडासन, त्रिकोणासन, वज्रासन, शवासन करून घेण्यात आले. यावेळी योगाप्रशिक्षक बोलताना म्हणाल्या, “दिव्यांग मुलांनी नियमितपणे योगासने केल्यास त्यांच्या शारीरिक क्षमतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते”.



यावेळी योग प्रशिक्षक मनीषा तरडे यांनी काही प्रात्यक्षिके करून दाखवली. व दिव्यांग विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आली कार्यक्रमाचे नियोजन विकास जगताप, ऋषिकेश मुसूडगे, सौ. कापसे योगेश, कुणाल यांनी केले. योगा दिनाची माहिती हांडे पाटील यांनी सांगितली. सूत्रसंचालन खेडेकर यांनी केले व आभार प्रदर्शन विकास जगताप यांनी केले.

जागतिक योग दिनानिमित्त रहाटणीत योग शिबिर संपन्न

पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजपची जोरदार तयारी

ग.दि. माडगुळकर नाट्यगृहात सेवा सुविधांचा अभाव..

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय