Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडकोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज मध्ये 'विवेक वाहिनी' चे उद्घाटन

कोल्हापुरातील विवेकानंद कॉलेज मध्ये ‘विवेक वाहिनी’ चे उद्घाटन

कोल्हापूर : आज डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आणि राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त
विवेकानंद कॉलेज मध्ये विवेक वाहिनी चे उद्घाटन झाले.
Adv.अभिषेक मिठारी यांनी विवेक वाहिनीची रचना आणि कार्य विषयी माहिती दिली.

विवेकवादी विचारसरणी ,वास्तववादी विचार याविषयी सुमारे 100 विद्यार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. न्यू कॉलेज कोल्हापूर येथे भरलेल्या विवेक वाहिनीची व तेथे राबविलेल्या विविध विषयांच्या उपक्रमांची माहिती व उदाहरणे अभिषेक मिठारी यांनी दिली, यावेळी प्रा.डॉ. आर.आर.कुंभार सरांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना अभिवादन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विवेकवाहिनीच्या समन्वयक फराकटे मँम,मराठे मँम,सर्व प्रा वर्ग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे वैज्ञानिक जाणीवा कोल्हापूर जिल्हा चे प्रमुख किरण गवळी सर यांच्या उपस्थितीत विवेक वाहिनीचे औपचारिक उद्घाटन झाल्याचे जाहीर करण्यात आले, सदर कॉलेजमध्ये यापुढे विवेक वाहिनी अंतर्गत चाकोरी बाह्य विवेकवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विविध उपक्रम घेतले जातील

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय