पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.०८ – चिंचवड कमला शिक्षण संकुल प्रतिभा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक सायकल व पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चिंचवड, निगडी परिसरात सायकल फेरी काढून घोषणा देत जनजागृती केली. तसेच, पर्यावरण दिनाचे निमित्त वृक्ष लागवड केली. विविध गृहसंकुलात व सार्वजनिक जागेतील प्लॉस्टिक, कचरा गोळा करून एकत्रित संकलन केले.
संस्थेचे सचिव डॉ. दिपक शहा, प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी, राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.आश्लेषा देवळे, प्रा.सुखलाल कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सेवा योजनेचे विद्यार्थी अथर्व दिघे, श्वेता वर्मा, अनिकेत शिंदे, सृष्टी पवार, दिपू सिंग, पूजा संके, नितेश चौधरी, वैष्णवी मिर्चे, अथर्व करिअप्पा यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रतिभा इंटरनॅशलन स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज (सीबीएससी बोर्ड) मध्ये कुशाग्र इनोव्हेशन फाँडेशनच्या वतीने संयुक्त कार्यक्रमात कचरा व्यवस्थापन व पर्यावरण जागृती विषयी विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व, कचरा व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन, पर्यावरणाचे रक्षण करण्याविषयी प्रतिज्ञा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे उत्तरे समर्पकपणे तज्ञांनी दिली. प्राचार्या सविता ट्रॅव्हीस, उपप्राचार्या लिझा सोझू शिक्षक यांनी मार्गदर्शन केले.