Saturday, May 18, 2024
Homeराज्यमहत्वाचे: सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी पोलिसांकडून महत्वाची सूचना; अन्यथा होऊ शकतो गुन्हा दाखल

महत्वाचे: सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी पोलिसांकडून महत्वाची सूचना; अन्यथा होऊ शकतो गुन्हा दाखल

मुंबई : अयोध्या येथे श्रीराम मंदीराचे पायाभरणीचा कार्यक्रम असल्याने कोणत्याही प्रकारचे लोकांमध्येे संभ्रम निर्माण करतील असे प्रकारचे मसेज टाकू नये. यासाठी पोलिसांनी नोटीस जारी केली आहेे.

महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ६८ नुसान सोशल मिडीयावर संभ्रम निर्माण करणारे मेसेज व्हायरल करू नये. जेणेकरून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण होवून कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. जर अशा स्वरूपाचे मॅसेज सोशल मिडीयावर म्हणजे एस.एम.एस., व्हॉट्स अप, फेसबुक, ट्वीटर हॅलो, टेलीग्राम किंवा इतर कोणत्याही डिजिटल माध्यमांमध्ये दोन समाजाच्या जातीय तेढ / धार्मिक तेढ निर्माण होईल असे कोणतेही प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह संदेश, साहित्य, चित्रफित इत्यादी कोणतीही व्यक्ति किंवा व्यक्तिंचा समूह प्रसारीत करता येणार नाही. अशा स्वरूपाचे मॅसेज सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास व्हायरल करणाऱ्या व त्या ग्रुप अँडमिनला कलम ६८ प्रमाणे प्रतिबंध करीत आहे. असे कृत्य केल्यास महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच भारतीय दंड संहीता कायदयानुसार त्यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशारा पोलिसांनी दिला आहे, या संबंधीची नोटीस देखील अनेक स्थानिक पोलिस ठाण्याने काढली आहे.

ग्रुप अँँडमिनने आपल्या सर्व सदस्यांना सुचना द्याव्यात तसेच सेटींग मध्ये जावून फक्त ग्रुप अँँडमिन मॅसेज सेंड करतील असे सेटींग करण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय