Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाआदर्शवत : अर्ध्यावर मोडलेला तिचा संसार त्याने मुलासह स्वीकारला

आदर्शवत : अर्ध्यावर मोडलेला तिचा संसार त्याने मुलासह स्वीकारला

युवा सामाजिक कार्यकर्त्याने ठेवला समाजापुढे आदर्श !

सोलापूर : सामाजिक कार्यकर्ता किशोर झेंडेकर या युवकाने एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. लग्न झाल्यावर पती गमावलेल्या युवतीशी त्याने संसार थाटून परंपरेला फाटा देत सहजीवनाच्या प्रवासाला सुरू केली.

या लग्नाला दोन्ही कुटुंब आणि मित्र परिवाराने भरभरून मदत केली आहे. रूपाली मदूर या सोलापुरात राहणाऱ्या २४ वर्षीय युवतीचे २०१७ मध्ये लग्न झाले. त्यांचा आनंदाचा संसार सुरू होता. मात्र काळाने घात केला अन् तिचे पती एक घटनेत गेले. त्यानंतर पदरी असणारे बाळ घेऊन ती आपल्या माहेरी राहू लागली. शिक्षण झाले होते. खासगी नोकरी करत ती आपले जगणे कंठत होती. त्याच वेळी किशोरला ही सगळी हकीकत समजली. नात्यात असल्याने आधीपासून एकमेकांची चांगली ओळख होती. 

किशोर हा मुळात चळवळीतला कार्यकर्ता. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियातून त्याच्या सामाजिक कार्याला सुरू झाली. त्याने पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक म्हणून खेडोपाडी जाऊन काम केले आणि ते आजही सुरू आहे. त्याच्या मनात रूपालीविषयी काळजी निर्माण झाली. त्याने आपल्या आईला ही काळजी बोलून दाखवली अन् आई अनिताने रीतसर मागणी घालून रूपालीबद्दल घरच्यांना विचारले. 

लग्नाला दोन्ही कुटुंबांचा होकर झाला. लग्नात रूपालीचा मुलगा श्रेयस याला जवळ बसवून लग्न सोहळा पार पडला. पाहणाऱ्या सगळ्यांनी या दोघांचे कौतुक केले. किशोर झेंडेकर या युवकाने सामाजिक परंपरेला फाटा देत केलेल्या लग्नाचे कौतुक होत आहे.

अर्धावरती संसार मोडला होता. पण भूतकाळ अन्र वर्तमान काळातील गुणदोषांसह स्विकारणाऱ्या जोडीदाराची साथ मिळाली.

– रुपाली झेंडेकर

आपल्याला सगळं काही मिळायला हवं, ही अपेक्षा ठेवणं खरं तर चुकीचं आहे. सगळं मिळवायला हवं, ते मिळत असताना इतरांना आनंद देता मायला हवं, ही माझी प्रामाणिक इच्छा असते. त्या विचारातून मी हा विवाह केल आहे. श्रेयसला बाबाचे प्रेम देत येईल, याचे खूप समाधान आहे.

 किशोर झेंडेकर


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय