Saturday, May 18, 2024
Homeराज्यशिक्षक भरती घोटाळा प्रकरणी "या" आयएएस अधिकाऱ्याला अटक

शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी “या” आयएएस अधिकाऱ्याला अटक

पुणे : पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने उघडकिस केलेल्या शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आता मोठी कारवाई करत एका आयएएस अधिकाऱ्याला अटक केली आहे.

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात मोठ्या अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

टीईटी प्रकरणामध्ये अटक असलेले परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या संपर्कात असलेले सुशील खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुशील खोडवेकर हे २०११ अधिकारी तथा कृषी विभागात प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्यरत होते. खोडवेकर हे शिक्षण विभागात २०१९ डिसेंबर २०२० कालावधीत कार्यरत होते. त्यांनी सावरीकर यांच्याकडून पैसे घेतले असल्याचे तपासात समोर आल्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. 

कोण आहे सुशील खोडवेकर?

सुशील खोडवेकर हे मूळ परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील आहेत. सध्या मुंबईत वास्तव्यास आहेत. खोडवेकर हे २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते शालेय शिक्षण विभागामध्ये उपसचिव होते. तसेच, ठाणे पालघर येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प त्यांनी काम केले आहे. 

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय