Saturday, May 18, 2024
Homeबॉलिवूडएखादा सिनेमा आवडला आणि त्याबद्दल लिहिण्याची हल्ली चोरीच झालीये, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत..

एखादा सिनेमा आवडला आणि त्याबद्दल लिहिण्याची हल्ली चोरीच झालीये, अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत..

मुंबई : नागराज मंजुळे यांचा झुंड ( jhund ) हा बहुप्रतिक्षित चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित झाला. झुंड चित्रपट पाहून अनेक बॉलिवूड कलाकार आणि दिग्दर्शकांनी नागराज मंजुळे यांचं कौतुक केलं आहे. अनेक दिग्दर्शकांनी हा चित्रपट ऑस्करसाठी जायला पाहिजे असे मत व्यक्त केलं आहे. तर आमिर खानने देखील नागराज मंजुळे यांचे कौतुक केले आहे. यामध्ये मराठी कलाकार देखील मागे नाहीत. त्यांच्याकडून झुंड सिनेमाचे तोंडभरून कौतुक सुरूच आहे. चित्रपटाला रसिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

एकीकडे झुंड बद्दल कौतुक होत आहे. तर दुसरीकडे याला उच्चवर्णीय आणि सामान्य असा रंग देणारी चर्चा सोशल मिडियावर होत आहे. अशातच सोशल मिडियावर सक्रिय असणाऱ्या अभिनेत्री हेमांगी कवी ( hemangi kavi ) यांची फेसबुकवरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. तसेच हेमांगी ची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

हेमांगी ही सोशल मिडियावर नेहमीच चर्चेत असते. ती तिचे मत परखडपणे मांडत असते. अगदी तिला जे वाटतं ते ती अगदि सरळ भाषेत बोलते किंवा सोशल मिडिया वर व्यक्त होत असते. यामुळे अनेकदा ती ट्रोल देखील होते‌. हेमांगीने झुंड चित्रपटाच्या अनुषंगाने एक पोस्ट लिहिली आहे, त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आहे.

काय आहे पोस्ट ?

हेमांगी लिहिते, “तुम्हांला एखादा सिनेमा आवडला आणि त्याबद्दल social media वर लिहिण्याची हल्ली चोरीच झालीये जणू! तुम्हांला लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं. हिंदीबद्दल share केलं तर मराठीबद्दल का नाही केलं? मराठी केलं तर ‘त्यांचं’ च केलंस ‘आमचं’ का नाही केलं! आडनावं पाहिली जातायेत! अरे!!! 

म्हणजे सगळं येऊन शेवटी ‘तिथंच’ अडतंय! 

किती काळ आणि वर्ष जाणार आहेत अजून त्यांचं आमचं मिटवायला? मग कशासाठी आणि कोणासाठी बनतायेत सिनेमे? ज्यांनी खरंच बघायची गरज आहे ते चाललेत आपले कट्टरतेच्या दिशेने. ज्याचा शेवट भयंकरच आहे. बरं हे भयंकर आहे हे कुणाला वाटतंय? तर मधल्या लोकांना! मस्त! 

मधले लोक जे हे काही मानत नाहीत त्यांची किती गोची झालीये की या मधल्या लोकांमुळेच जग अजून ही स्थिर स्थावर आहे? 

जगा आणि जगू द्या तसंच

सिनेमा बद्दल सांगा आणि सांगू द्या!

सून भांडखोर आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !

जाणून घ्या ! रोज सेक्स करण्याचे हे आहेत 9 फायदे

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय