Tuesday, July 23, 2024
Homeराज्य"गंदा है पर धंदा है ये" नितेश राणे यांनी केली "यांच्या"वर टीका

“गंदा है पर धंदा है ये” नितेश राणे यांनी केली “यांच्या”वर टीका

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि राणे कुटूंबीय यांच्यातील वाद टोकाला गेलेला बघायला मिळत आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरण, दिशा सॅलियनच्या मृत्यूवरून ठाकरे सरकारवर केलेली टीका असो किंवा इतर मुद्यावरून ठाकरे सरकारला राणे कुटूंबीयांनी केलेले लक्ष, यावरून राणे आणि ठाकरे सरकार मधील वाद हा टोकाला गेलेला पाहायला मिळत आहे. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुण्यातील दौऱ्यांवर शिवसेनाचे मुखपत्र सामना मधील जाहिरातीवरून भाजप आमदार नितेश राणे यांनी सामनावर टीका केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्याच्या दौऱ्यांवर होते त्यांच्या हस्ते मेट्रोचे लोकार्पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण यासह अनेक विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले. यासंदर्भात अनेक विविध वृत्तपत्रात जाहिराती देण्यात आल्या होत्या, मात्र भाजप आमदार नितेश राणे यांनी याचाच एक धागा पकडून “सामना”वर टीका केली आहे. 

नितेश राणे यांनी सामनातील जाहिरातीचा फोटो ट्वीट करून, “गंदा है पर धंदा है ये” अशी टीका केली आहे. आता यावर शिवसेनेकडून काही प्रत्यूत्तर देण्यात येणार का? हे पहावे लागणार आहे.

सुन भांडखोर आहे, मग न्यायालयाचा ‘हा’ महत्वपूर्ण निकाल जरूर वाचा !

नंदी दुध पित असल्याच्या अफवेने राज्यभर मंदिरात उसळली गर्दी, अंनिसने सांगितले “हे” कारण

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये पदवी आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या २०६ जागा !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय