junnar / आनंद कांबळे : जुन्नर तालुका शिक्षक पालक संघ व कनक प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपटाळे येथील भाऊसाहेब बोरा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय येथे व्याख्यानमालेत सहभागी असणाऱ्या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळांचा सन्मान सोहळा पालक संघाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता.
मुंबई येथील कनक प्रतिष्ठानच्या वतीने व शिक्षक पालक संघ जुन्नर (Junnar) यांच्या माध्यमातून आदिवासी डोंगराळ भागातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर महिन्यामध्ये मोफत व्याख्यानमाला आयोजित केली जाते.
सतत १८ वर्ष व्याख्यानमालेचे आयोजन करून इंग्रजी, गणित, भूमिती, समाजशास्त्र अशा विषयांचे मोफत मार्गदर्शन केले जाते. यावर्षी प्रतिष्ठानचे संस्थापक संचालक कैलास चव्हाण यांच्या सेवापुर्ती निमित्त २०२४ मधील व्याख्यानमालेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक शाळेतील गुणांनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा व ज्या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे, अशा शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक यांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता.
यानिमित्ताने सहभागी शाळेतील गुणांनुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन तसेच ज्या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे,अशा शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक यांचा देखील भव्य सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देवाडे, रोटरी क्लब ऑफ जुन्नर (Junnar) शिवनेरीचे अध्यक्ष सुनिल जाधव उपस्थित होते. त्यांच्या समवेत कनक प्रतिष्ठानचे संस्थापक प्राचार्य श्रीधर घरत, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते, सेक्रेटरी फकीर आतार, व्याख्यानमालेचे प्रमुख गोविंद गुंजाळ, शिवकार्याचे चेअरमन आदिनाथ चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक कैलास चव्हाण, प्राचार्य बी.के.बांगर, दत्ता म्हस्के, सरपंच गुलाबराव साबळे, उपसरपंच बाळासाहेब उतर्डे आदी मान्यवर शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव फकीर आतार यांनी तर सूत्रसंचालन शिवाजी पिसे व आभार प्राचार्य बी.के. बांगर यांनी केले. कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
हेही वाचा :
‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’द्वारे ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्र भेटीची इच्छा शासन पूर्ण करणार
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
मोठी बातमी : भारताला मोठा धक्का ; ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अंतिम फेरीतून अपात्र
साप पकडताना सर्पमित्राला सापाचा दंश, सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू
BSNL लवकरच 5G आणणार, पहिला 5G व्हिडीओ कॉल यशस्वीरित्या
बांगलादेशातील दंगलीत २५ लोकांना जिवंत जाळले, फाईव्ह स्टार हॉटेल पेटवले