Thursday, December 26, 2024
Homeजिल्हाकराड, कोयना परिसरात तुफान पाऊस, कृष्णा कोयनेला पूर

कराड, कोयना परिसरात तुफान पाऊस, कृष्णा कोयनेला पूर

कराड / क्रांतीकुमार कडुलकर : जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले असून सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे, कराड शहरात रात्रभर पाऊस सुरू आहे. गुजरात आणि पश्चिम समुद्र किनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा आहे. कोकणात जनजीवन विस्कळीत झाले आहे, तळकोकण, वेंगुर्ला, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, चिपळूण सह अनेक शहरात आठवडाभर पाऊस सुरू आहे.

कोकण किनारवरील पावसाचे घनदाट ढग आता पश्चिम महाराष्ट्राकडे निघाले आहेत. बुधवारी (२१ जुलै) तुफानी पावसाने कोयना परिसरात धुमाकूळ घातला आहे. कराड मध्ये कृष्णा कोयना संगमावर पाण्याची पातळी अनपेक्षित पणे वाढत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३३ हजार ९१४ क्युसेक आहे. धरणात ५८.९५ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यात तब्बल चार टीएमसीने वाढ झाली आहे. उद्या गुरुवारी (ता.२२) सकाळी अकरा वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून कोयना नदीत दोन हजार १०० क्युसेक पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती कोयना प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार यांनी दिली. त्याचे नियोजन धरण व्यवस्थापनाने केले आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहातील दोन्ही युनिट सुरू करणार असल्याने पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पात्रात वाढ होणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कते चा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय