Friday, December 6, 2024
Homeजिल्हाकृष्णा भंडारी यांची बिरसा फायटर्स पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड

कृष्णा भंडारी यांची बिरसा फायटर्स पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड

पुणे : कृष्णा भंडारी यांची बिरसा फायटर्स संघटनेच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा  यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 21 जुलै रोजी ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेत  राज्य पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून बिरसा फायटर्स चे संस्थापक अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी कृष्णा भंडारी यांची पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड केल्याचे घोषित केले.

तत्पूर्वी कृष्णा भंडारी यांनी बिरसा फायटर्स  संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरून त्यांची समाजाबद्धल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन त्यांना पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व आदिवासी लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे यावेळी नवनियुक्त पुणे जिल्हाध्यक्ष कृष्णा भंडारी यांनी सांगितले आहे.


संबंधित लेख

लोकप्रिय