Monday, May 20, 2024
Homeनोकरीमोठी बातमी : आरोग्य विभागातील तब्बल ११ हजार पदांसाठी बंपर भरती

मोठी बातमी : आरोग्य विभागातील तब्बल ११ हजार पदांसाठी बंपर भरती

मुंबई : राज्यातील बेरोजगार तरुणासांठी खुशखबर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या आरोग्य विभागातील जवळपास 11 हजार पदांसाठीची जाहिरात मंगळवारी येणार आहे. पोलीस भरती, वनभरती व तलाठी भरती प्रक्रियेची जाहिरात निघाल्यानंतर आता आता सरकारकडून आरोग्य विभागातील ११ हजार पदांच्या बंपर भरतीची घोषणा करण्यात आली आहे.

ठाण्यात एकाच दिवशी 18 जणांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेला वेग आहे. आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण येत आहे. याबाबत सातत्याने तक्रारी येत होत्या. या नंतर आता आरोग्य विभागातील रिक्त असलेल्या ११ हजार पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे.

‘क’ आणि ‘ड’ श्रेणीतील 10,949 जागांसाठी ही जाहिरात निघणार आहे. आरोग्य सेवकांच्या क आणि ड वर्गासाठी होणारी ही भरती एमपीएससी, राज्य निवड मंडळ आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्यामार्फत केली जाणार आहे. ’क’ वर्गातील 55 प्रकारची विविध पदे, तसेच ‘ड’ वर्गातील 5 प्रकारची विविध पदे भरली जाणार आहेत, अशी एकूण 10 हजार 949 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय