न्यूयॉर्क :- लोक काय काय उपद्व्याप करतील हे काही सांगता येत नाही. आता अमेरिकेतील विल रॉजर्स या माणसाने चक्क मद्यापासून आईस्क्रीम बनवून ती विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. त्याने असे आईस्क्रीम बनवले आहे ज्यामध्ये गोठलेलं अल्कोहोल आहे!
नवजात मुलासाठी आईने प्राण दिल्याच्या व्हायरल पोस्टचे वाचा सत्य !
शुन्याखालील तापमान असणार्या एका यंत्राद्वारे त्याने हे आईस्क्रीम बनवले आहे. विल रॉजर्सचे स्वतःचे आईस्क्रीम पार्लर आहे. तिथेच त्याला असे आईस्क्रीम बनवण्याची कल्पना सूचली. आधी त्याने कॅफेनसह आईस्क्रीम बनवले आणि नंतर अल्कोहोलसह. यासाठी त्याने एका विशिष्ट जेलचाही वापर केला असून आता अशा आईस्क्रीमबाबतचे पेटंटही मिळवले आहे. या विशिष्ट जेलमध्ये अल्कोहोल मिसळून ते शुन्यापेक्षा खाली तापमानात गोठवले गेले.
मुली रात्री एकांतात मोबाइलवर काय सर्च करतात ? या चार गोष्टी आहेत
आधी त्यांनी लिक्विड नायट्रोजनद्वारे हे फ्रीज करण्याचा प्रयत्न केला होता; पण नंतर ‘बिलो झीरो आईस्क्रीम मशिन’द्वारे त्यांना हे शक्य झाले. तीस मिनिटांमध्येच हे अल्कोहोलचे आईस्क्रीम तयार होते. अर्थातच या आईस्क्रीममध्ये दुधाचा वापर होत नाही!
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
केंद्र सरकारच्या खर्च विभागाच्या 590 जागा, आजच अर्ज करा!