Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडशाहूनगर येथे हनुमान जयंती उत्सव संपन्न

शाहूनगर येथे हनुमान जयंती उत्सव संपन्न

पिंपरी चिंचवड: शाहूनगर येथील दक्षिण मुखी मारुती मंदिरामध्ये महाबली प्रतिष्ठानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला.आदल्या दिवशी रात्री बारा वाजल्यापासून होम हवन व इतर धार्मिक विधी करण्यात आले.पहाटे पाच वाजता ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले.

सकाळी सूर्योदयाच्या वेळी हनुमान उत्सव साजरा करण्यात आला.तसेच या हनुमंत जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने ६ एप्रिल रोजी रामायण रामलीला हा कार्यक्रम पार पडला.सदर कार्यक्रमाचे प्रायोजन वाराणसी येथील पंडित हरिश्चंद्र उपाध्ये यांनी केले.वरील दोन्ही कार्यक्रमासाठी भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.काळपासून दर्शनासाठी मोठ्या रांगा लागलेल्या होत्या.

मंदिरामध्ये दिवसभर वेगवेगळ्या भजनी मंडळाचे कार्यक्रम पार पडले.सायंकाळी सात वाजता आरती होऊन दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचा आयोजन केले आहे. सदर उत्सवाचे संयोजन विजय महल्ले व कार्याध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे तसेच तसेच इतर महाबली प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यांनी केले

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय