जुन्नर : हडसर ग्रामस्थांनी विविध प्रश्नांना घेऊन वनाधिकारी फुलसुंदर यांची भेट घेतली, यावेळी केवाडी केंंद्राचे वनरक्षक रेंगडे उपस्थित असल्याची माहिती विजय सांगडे यांनी दिली. वन विभागाने दिलेल्या गॅस टाक्या भरुन दिल्या जात नाही, तसेच हडसर खिंडीतील पाऊलवाट तसेच रस्त्याबाबत चर्चा केली.
यावेळी बोलताना फुलसुंदर यांनी सांगितले की, गॅस टाक्याबाबत लवकरच आपल्या गावात येऊन शंकेचे निर्सन करण्यात येइल. तसेच आपल्या किल्यासाठी जो वन विभागाकडून रस्ता आलेला आहे, त्याचे काम अंतिम टप्या मध्ये आले आहे. ते काम लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, या साठीच्या ५ फुटाच्या रस्त्याच्या मान्यतेचे पत्र ग्रामपंचायतकडे प्राप्त झाले आहे. किल्ल्यावर चर खोदणे कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
यावेळी राजेंद्र शेळके, ज्ञानेश्वर शेळके, राजेंद्र सांगडे, विजय सांगडे, सुरेश सांगडे, किरण सांगडे, दिगंबर गवारी, नारायण सांगडे, अमोल शेळके, अजय गवारी इत्यादी उपस्थित होते.