Monday, July 8, 2024
HomeनोकरीGovernment Job : ना कोणती परिक्षा, ना मुलाखत; दहावीच्या मेरीटवर होणार भरती

Government Job : ना कोणती परिक्षा, ना मुलाखत; दहावीच्या मेरीटवर होणार भरती

India Post Recruitment 2024 : दहावी पास उमेदवारांना भारतीय पोस्ट खात्यामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय पोस्ट खात्याकडून तब्बल 35 हजार ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या मेगा भरतीची माहिती देण्यात आली आहे. (Government Job)

15 जुलै 2024 रोजी याबाबत अधिकृत अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. जे उमेदवार पोस्टाच्या परीक्षेसाठी तयारी करत आहे. त्यांच्यासाठी मोठी संधी असणार आहे. ‘ग्रामीण डाक सेवक’ पदाची पात्रता पूर्ण करणारे उमेदवार 15 जुलै अधिकृत अधिसूचना जारी झाल्यांनतर तात्काळ अर्ज करू शकणार आहे. (Government Job)

● पद संख्या : 35,000

● पदाचे नाव : ग्रामीण डाक सेवक

● आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याने/तिने दहावी परीक्षेत आपल्या मातृभाषेचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवाराला संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

● वयोमर्यादा : 18 ते 40 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळणार आहे.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : भारतीय पोस्ट खात्याकडून ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी अद्याप जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. याबाबत अधिकृतरित्या माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांसाठीची अर्जप्रक्रिया ही 15 जुलैपासून सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अर्थात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज करण्याची अंतिम तारीख ऑगस्टमध्ये असू शकते.

● निवड करण्याची प्रक्रिया ?

भारतीय पोस्ट खात्याच्या ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांसाठी उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. उमेदवारांना 10वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे त्यांच्या निवड होईल. ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर ‘डीवा राउंड’ पार पडल्यानंतर उमेदवाराची अंतिम निवड होईल. निवड झाल्यानंतर प्रत्येक मंडळाची गुणवत्ता यादीही स्वतंत्रपणे प्रसिद्ध केली जाईल.

● किती पगार मिळेल?

‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS) पदांवर निवड झाल्यास उमेदवारांना पदानुसार वेतन मिळेल. एबीपीएम/जीडीएस पोस्टचा पगार दरमहा 12 हजार ते 24 हजार रुपये इतका असेल. तर बीपीएम पदांचा पगार 12 हजार रुपये ते 29 हजार रुपये प्रति महिना इतका असणार आहे.

● किती असेल परीक्षा शुल्क?

भारतीय पोस्ट खात्यात ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित श्रेणी आणि पीएच श्रेणीतील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

● अधिक माहितीसाठी : भारतीय पोस्ट खात्याच्या indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

India Post Government Job Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच…
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिके अंतर्गत तातडीने भरती, असा करा अर्ज !

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

FSSAI अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती, असा करा अर्ज!

NHB : राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

Mumbai : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

मोठी बातमी : भारतीय पोस्ट खात्यात 35,000 जागांसाठी मेगा भरती!

मोठी बातमी : राज्यातील गट ‘क’ पदांच्या सर्व परीक्षा आता एमपीएसीद्वारे

हिंदुस्तान कॉपर लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरू

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

Law College : डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय