Saturday, May 18, 2024
Homeजिल्हाशिष्यवृत्ती व डॉ. आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ त्वरीत विद्यार्थ्यांना देण्याची डीवायएफआयची मागणी

शिष्यवृत्ती व डॉ. आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ त्वरीत विद्यार्थ्यांना देण्याची डीवायएफआयची मागणी


डीवायएफआयचे समाजकल्याण आयुक्तांना निवेदन

परभणी : आज भारत सरकारकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात त्वरित वितरित करा तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची यादी लवकरात लवकर जाहीर करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्या, या मागणीचे निवेदन डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया परभणी आणि पूर्णा तालुका कमिटीकडून समाज कल्याण आयुक्त परभणी यांना देण्यात आले.

परभणी जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती न मिळाल्याने विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. दरवर्षी पहिल्या सत्र परीक्षेच्या अगोदर शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात येत असते परंतु आता चौथे सत्र उलटत आले आहे, तरी एक सुद्धा शिष्यवृत्तीचा टप्पा आलेला नाही. त्यामुळे त्वरीत विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती वितरित करावी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची यादी जाहीर करून लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर डीवायएफआयचे जिल्हासचिव नसीर शेख, जिल्हा उपाध्यक्ष अमन जोंधळे पूर्णा तालुकाध्यक्ष सचिन नरनवरे, पूर्णा शहराध्यक्ष सुमित वेडे, तालुका सहसचिव अजय खंदारे, शहर सचिव संग्राम नजान आणि पांडुरंग दुथडे, शुभम गायकवाड, त्रिशरन लहाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 7 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सीमा रस्ते संघटन (BRO) मध्ये 876 जागांसाठी भरती, पुणे येथे 10 वी, 12 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज !

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय