Wednesday, December 4, 2024
Homeपर्यटनपर्यटकांसाठी आनंदाची बातमी लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो

पर्यटकांसाठी आनंदाची बातमी लोणावळ्याचे भुशी धरण ओव्हरफ्लो

लोणावळा : मागच्या तीन चार दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण देखील ओव्हरफ्लो झाले आहे. धरणाच्या पायऱ्यांवरून ओसंडून वाहणारे धरणाचे पाणी पर्यटकांना भुरळ घालत आहे. येथे २५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पावसाळ्यात लोणावळा परिसरात आल्हाददायक वातावरण असते. पुणेकरांचे सहलीचे प्लॅन असतात त्यात लोणावळ्याच्या भुशी डॅमवर पर्यटक गर्दी करतात. मावळातील पश्चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने याठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

विकेंडला पर्यटनासाठी जायला आता काही हरकत नाही. दोन वर्षांच्या कोरोना महामारीनंतर प्रथमच पर्यटकांना पर्जन्यसहलीचा आस्वाद घेता येणार आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय